30.1 C
New Delhi
Friday, September 19, 2025
Homeताज्या बातम्याभारतविरोधी विधाने करणाऱ्या महिलेविरोधात गंभीर गुन्हा दाखल!

भारतविरोधी विधाने करणाऱ्या महिलेविरोधात गंभीर गुन्हा दाखल!

शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई..!!

पुणे शहरातील महंम्मदवाडी परिसरातील मारगोसा हाइट्स सोसायटी येथे वास्तव्यास असलेल्या फराह दिबा नामक महिलेविरोधात भारतविरोधी आणि पंतप्रधानांविरोधातील आक्षेपार्ह विधाने केल्याप्रकरणी गंभीर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सदर महिला सोसायटीतील महिलांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर भारतविरोधी भावना भडकावणारे संदेश, तसेच पंतप्रधानांविषयी अत्यंत अवमानकारक आणि अशोभनीय विधाने सातत्याने करत होती. यामुळे सोसायटीतील नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला होता व सामाजिक सलोख्यावरही परिणाम होण्याची शक्यता होती.
या प्रकाराची गंभीर दखल घेत, शिवसेना पुणे शहर प्रमुख मा. प्रमोद नाना भानगिरे यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात लेखी निवेदन दिले. त्यानंतर सोसायटीतील विविध रहिवाशांनीही स्वतःच्या नावाने लेखी तक्रारी सादर केल्या. या सर्व तक्रारींच्या आधारे भारतीय दंड संहिता कलम 152, 196, 197, 352 आणि 353 अंतर्गत काळेपडळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रमोद नाना भानगिरे म्हणाले की, “कोणताही भारतीय नागरिक अशा देशविरोधी आणि राष्ट्रनायकांविरोधातील विधाने सहन करणार नाही. शिवसेना म्हणून आम्ही भारतीय अस्मिता आणि पंतप्रधानांचा अपमान करणाऱ्या कोणत्याही कृत्याचा तीव्र निषेध करतो व कायद्याच्या माध्यमातून कठोर कारवाईची मागणी करतो.सदर प्रकरणाची पुढील चौकशी काळेपडळ पोलीस प्रशासनामार्फत सुरू आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
30.1 ° C
30.1 °
30.1 °
70 %
2.1kmh
20 %
Fri
34 °
Sat
38 °
Sun
38 °
Mon
38 °
Tue
38 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!