इंडोनेशियाच्या पश्चिम जावा प्रांतात शनिवारी रात्री ६.५ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. ज्यामुळे समुद्रात महाकाय लाटा निर्माण झाल्या होत्या. त्याबाबतची माहिती हवामानशास्त्र संस्थांनी दिली. जकार्ता येथील वेळेनुसार शनिवारी साडे अकरा वाजता भूकंप झाला. त्याचा केंद्रबिंदू गरुत रीजेंसीपासून 151 किमी नैऋत्येस आणि 10 किमी खोलीवर होता.भूकंपाचे धक्के इंडोनेशियाची राजधानी जकार्ता (Jakarta) आणि नजीकच्या बांटेन प्रांतात तसेच मध्य जावा, योग्याकार्टा आणि पूर्व जावा प्रांतातही जाणवले.