नवी दिल्ली : इस्रो (ISRO)अंतराळात स्पेस डॉकिंग प्रयोग करणार आहे. या तंत्रज्ञानाद्वारे अंतराळात दोन अंतराळयान एकत्र जोडले जाणार आहेत. ही मोहीम यशस्वी झाल्यास इस्रो आणखी एक इतिहास रचणार आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थाश्रीहरिकोटा येथून स्पॅडेक्स मिशनचे प्रक्षेपण झाले आहे. इस्रोने सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. इस्रोच्या या मोहिमेचे यश भारतीय अंतराळ स्थानक (BAS) आणि चांद्रयान-4 मोहिमेचे यश ठरवेल, असा विश्वास आहे. त्यामुळे हे प्रक्षेपण अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
या मोहिमेत दोन उपग्रह आहेत. दोन्ही उपग्रहांचे वजन सुमारे २२० किलो असेल. त्यापैकी एक चेझर असेल आणि एक उपग्रह लक्ष्य असेल. या मोहिमेचे मुख्य लक्ष्य डॉकिंग आणि अनडॉकिंग करणे आहे. अंतराळ डॉकिंग प्रयोग जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात केला जाईल. हा प्रयोग पृथ्वीपासून सुमारे ४७० किमी अंतरावर असेल. प्रयोग यशस्वी झाल्यानंतर, दोन्ही उपग्रह दोन वर्षे पृथ्वीभोवती फिरतील. उपग्रह चेझरमध्ये कॅमेरा आहे. तर उपग्रह लक्ष्यात दोन पेलोड आहेत. या प्रयोगामुळे भविष्यात इस्रोला कक्षेतून बाहेर पडल्यानंतर वेगळ्या दिशेने जाणारा भाग पुन्हा कक्षेत आणण्याचे तंत्रज्ञान मिळणार आहे. याशिवाय कक्षेत सर्व्हिसिंग आणि इंधन भरण्याचा पर्यायही खुला होणार आहे. स्पेसेक्स मिशनमध्ये दोन भिन्न अंतराळयान अंतराळात एकमेकांशी जोडलेले दाखवले जातील.
जगातील फक्त तीन देश, अमेरिका, रशिया आणि चीनकडं अवकाशात डॉकिंग तंत्रज्ञान आहे. या देशांनी हे तंत्र कोणासोबतही शेअर केलेलं नाही. भारत स्वतःहून हे यश मिळवेल. जर भारतानं ही मोहीम यशस्वी केली तर भारत हा चौथा देश बनेल. अंतराळात डॉकिंग तंत्रज्ञानाच्या आगमनानं भारताला मोठा फायदा होईल. या तंत्रज्ञानामुळं भारताला अंतराळ केंद्र स्थापन करता येईल. याशिवाय, चांद्रयान-4 च्या यशात हे तंत्रज्ञान मोठी भूमिका बजावेल. म्हणूनच डॉकिंग सिस्टममध्ये प्रभुत्व मिळवणं, ही भारतासाठी एक मोठी उपलब्धी असेल.
चांद्रयान-4 साठी अंतराळात डॉकिंग हे अत्यंत महत्त्वाचे तंत्रज्ञान आहे. डॉकिंग म्हणजे वेगवेगळे भाग एकमेकांच्या दिशेने आणणे आणि त्यांना जोडणे. अंतराळातील दोन भिन्न गोष्टींना जोडण्याचे हे तंत्रज्ञान भारताला स्वतःचे अंतराळ स्थानक तयार करण्यास मदत करेल.
चांद्रयान-4 प्रकल्पातही त्याची मदत होईल. स्पॅडेक्स म्हणजेच एका उपग्रहाचे दोन भाग असतील. हे एकाच रॉकेटमध्ये ठेवून प्रक्षेपित केले जातील. हे दोन्ही अवकाशात वेगवेगळ्या ठिकाणी सोडले जातील.