नांदेड – 1827 पासून परंपरा, शुद्धता, विश्वास,पारदर्शकता,नाविन्यता या पंचसूत्रांवर आधारित विश्वास संपादन केलेल्या चंदुकाका सराफ ज्वेल्स् यांच्या सुवर्ण दालनाचा भव्य, शानदार शुभारंभ बुधवार दि. ७ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी 11.०७ वाजता डॉ. महेशकुमार डोईफोडे, आयुक्त,नांदेड वाघाळा शहर मनपा यांच्या शुभहस्ते व डॉ. फरहत बेग, सहायक आयुक्त तथा उद्यान अधीक्षक, नांदेड वाघाळा शहर मनपा., मा. श्री. मोहनराव मारोतराव हंबर्डे, आमदार, नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ, मा. श्री. बालाजीराव कल्याणकर नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ, मा. श्री, शहाजी उमाप पोलीस अधीक्षक नांदेड, भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. अनिरूध्द देशमुख व चंदुकाका सराफ ज्वेल्स् संचालक श्री अतुल जिनदत्त शहा, सौ. संगीता अतुल शहा, श्री. सिध्दार्थ अतुल शहा , श्री. आदित्य अतुल शहा व अन्य मान्यवरांच्या उपस्थीतीत महात्मा फुले मार्केट, ITI कॉर्नर नांदेड येथे संपन्न झाला. सकाळ पासूनच नांदेडकरांनी दागिने खरेदीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता.
यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी चंदुकाका सराफ ज्वेल्स् यांचे नांदेड शहरात त्यांची शाखा सुरू केल्याबद्दल विशेष अभिनंदन केले. यामुळे नांदेड शहराच्या विकासाला चालना मिळणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी सर्व मान्यवरांचा सत्कार चंदुकाका सराफ ज्वेल्स् च्या वतीने श्री अतुल जिनदत्त शहा, श्री. सिध्दार्थ अतुल शहा, श्री. आदित्य अतुल शहा यांनी केला.
उद्घाटनानिमित्त चंदुकाका सराफ ज्वेल्स् यांनी अनेक आकर्षक ऑफर्स जाहीर केल्या असून ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन नांदेडकरांना केले आहे. दिनांक ७ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट या कालावधीत रू. १५,०००/- पासून पुढील दागिने खरेदीवर अनेक बक्षिसे ग्राहकांना मिळण्याची सुवर्णसंधी आहे. यामध्ये ६ लॅपटॉप, ३ स्कूटर , ५ मोबाईल, सारेगामा कारवान, खात्रीशीर व्हाऊचर्स, तसेच Rs. 3000 पासून योजनेतील गुंतवणुकीवर हमखास भेटवस्तू मिळणार आहेत.
यावेळी बोलताना श्री. अतुल शहा म्हणाले की, कृषी आणि उद्योगांचे महत्वाचे केंद्र असलेल्या व धार्मिक वारसा लाभलेल्या नांदेड शहरात सुरू होणारी चंदुकाका सराफ ज्वेल्स् ची ही बारावी शाखा आहे. शुद्ध सोने, माफक घडणावळ, चांदीचा शुद्धतेनुसार दर, परंपरा व नाविन्याचा मेळ साधणारी सोने व हिरेजडीत दागिन्यांची आकर्षक डिझाइन्स, लाईटवेट दागिन्यांची भरपूर व्हरायटी अशी विशेष वैशिष्ट्ये असणार्या या पेढीने ग्राहकांनी ठेवलेल्या विश्वासाला सार्थ ठरवून यशस्वी निरंतर वाटचाल केली आहे. ग्राहकांच्या याच पाठिंब्यामुळे आज नांदेड शहरात चंदुकाका सराफ ज्वेल्स्ची शाखा सुरू होत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
समृध्द आणि सुजलाम-सुफलाम नांदेड शहरात पदार्पण करताना आमचा आनंद द्विगुणीत होत असून आता नांदेडचे सौंदर्य अधिक खुलविण्यासाठी आम्ही आलो आहोत. चंदुकाका सराफ ज्वेल्स् च्या माध्यमातून नांदेडकरांना साजश्रृंगारासाठी आता मिळणार उत्तमोत्तम आणि अभिनव पर्याय. नांदेडकरांचे व आमचे अतूट नाते निर्माण होईल असा विश्वास चंदुकाका सराफ ज्वेल्स् चे संचालक श्री अतुल शहा यांनी व्यक्त केला. उद्घाटन समारंभ व योजनांचा लाभ समस्त नांदेडकरांनी घ्यावा असे आवाहन संचालक श्री सिध्दार्थ शहा यांनी यावेळी केले.
फोटो ओळी – चंदुकाका सराफ ज्वेल्स्च्या नांदेड शाखेचा शुभारंभ करताना डॉ. महेशकुमार डोईफोडे शेजारी डॉ. फरहत बेग, श्री. मोहनराव मारोतराव हंबर्डे, श्री. बालाजीराव कल्याणकर, श्री अतुल जिनदत्त शहा, सौ. संगीता अतुल शहा, श्री. सिध्दार्थ अतुल शहा, श्री. आदित्य अतुल शहा व अन्य मान्यवर.