20.1 C
New Delhi
Tuesday, December 3, 2024
Homeदेश-विदेशपुण्यात सीबीआयची मोठी कारवाई!

पुण्यात सीबीआयची मोठी कारवाई!

फ्रॉड कॉल सेंटरवर छापे टाकत १० जणांना अटक! लाखोंच्या साहित्यासह ३ आलीशान मोटारी जप्त

पुणे- केंद्रीय तपास यंत्रणा म्हणजेच सीबीआयने राज्यात विविध ठिकाणी छापेमरी केली आहे. तब्बल ३६ ठिकाणी छापे घालण्यात आले असून पुण्यातील १० ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत बेकायदेशीर रित्या कॉल सेंटर चालवून सायबर फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत पुण्यातून १० जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून लाखो रुपयांच्या साहित्यासह तीन आलीशान कार जप्त करण्यात आल्या आहेत.
राज्यात सीबीआयने सायबर चोरट्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे. तब्बल ३६ ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. राज्यसह देशात देखील अनेक ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. नागरिकांना जाळ्यात अडकवून त्यांची ऑनलाइन पद्धतीने फसवणूक केली जात होती. त्यामुळे सायबर गुन्हेगारी नेटवर्क विरोधात सीबीआयची ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.

सीबीआयने केलेल्या या कारवाईत पुण्यातून १०, हैदराबादमधून ५ व विशाखापट्टणम येथून ११ अशा २६ जणांना देशभरातून या सायबर फ्रॉड प्रकरणी सीबीआयने अटक केली आहे. सीबीआयमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय संचालन विभागाने २४ सप्टेंबर रोजी ऑपरेशन चक्र-३ च्या माध्यमातून सायबर फसवणुकीबाबत खटला दाखल करत या प्रकरणी तपास करत असतांना गुरुवार सायंकाळपासून आजपर्यंत पुणे, हैदराबाद, अहमदाबाद व विशाखापट्टण येथील ३२ वेगवेगळ्या ठिकाणी छापे घालण्यात आले. पुण्यातील रिजेंट प्लाझा या ठिकाणी सुरू असलेल्या कॉल सेंटरवर सीबीआयच्या पथकाने छापे टाकले. सायबर नेटवर्कच्या माध्यमातून कॉल सेंटरमधील काही कर्मचारी या गुन्हात असल्याची शक्यता आहे. आता पर्यंत या प्रकरणी विविध कॉल सेंटरमधून १७० जणांना अटक करण्यात आली असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. कारवाई करण्यात आलेल्या ठिकांनावरून मोबाईल फोन, लॅपटॉप तसेच काही इलेक्ट्रॉनिक वस्तु देखील जप्त करण्यात आली आहे. गुन्हे अन्वेषण विभागाने केलेल्या कारवाईत ५८ लाख रुपयांची रोकड व ३ आलीशान मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
20.1 ° C
20.1 °
20.1 °
60 %
1.5kmh
0 %
Tue
25 °
Wed
27 °
Thu
26 °
Fri
26 °
Sat
26 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!