आज गुरुपौर्णिमा असून भगवा ध्वज आपल्या सर्वांचा गुरू आहे. हा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. त्याचा आपण मान मनापासून राखला पाहिजे, असे आवाहनही फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना केले. 2013 ला आपण असेच अधिवेशन घेतले होते आणि 2014 ला निवडून आलो. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचेच सरकार येणार आहे. हा भाजपचा विचार गावापर्यंत पोहोचविणार आहे. 2019 च्या निवडणुकीत लोकांचा पाठिंबा बघितला. 2014 लाही जनता आपल्या पाठीशी होती. दरम्यान, फडणवीस यांनी विरोधकांना ठोकून काढण्याचे आदेश दिल्यावर कार्यकर्त्यांनी जोरदार प्रतिसाद दिला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन होत आहे. त्याला भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार प्रतिसाद दिला. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचे सरकार येणार, हे मी लिहून देतो, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात बालेवाडीत भाजपच्या अधिवेशनात जोरदार भाषण केले.तसेच, त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला. याबाबतची माहिती अशी मिळत आहे की, आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विरोधक बॅटिंग करीत आहेत त्यामुळे भारतीय जनता पक्षातील प्रत्येकाला मैदानात उतरून जोरदार बॅटिंग करायची आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी कुठल्याही आदेशाची वाट न पाहता विरोधकांना ठोकून काढा, असा स्पष्ट आदेश दिला.
भगवा ध्वज आपल्या सर्वांचा गुरू!
RELATED ARTICLES
New Delhi
haze
17.1
°
C
17.1
°
17.1
°
67 %
1.5kmh
0 %
Wed
22
°
Thu
25
°
Fri
26
°
Sat
25
°
Sun
24
°


