24.2 C
New Delhi
Thursday, October 9, 2025
Homeदेश-विदेशभूस्खलनामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत

भूस्खलनामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत

इटानगर- अरुणाचल प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे भूस्खलन होऊन राष्ट्रीय महामार्ग-३१३ चा हुनली आणि एनेनी दरम्यानचा एक भाग कोसळला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. एका अधिकाऱ्याने गुरुवारी ही माहिती दिली.

भूस्खलनानंतर दिबांग व्हॅलीचा संपर्क जिल्हा मुख्य भागापासून तुटला आहे. जिल्हा प्रशासनाने रस्ते दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर पार पाडण्यासाठी कामगार आणि पुरेशी मशीन तैनात केली आहेत. भारत-चीन सीमेपासून सुमारे ८३ किमी अंतरावर असलेल्या लोअर दिबांग खोऱ्यातील रोइंग ते अनिनीला जोडणारा मुख्य राष्ट्रीय महामार्ग खराब झाला आहे.अधिकाऱ्याने सांगितले की, बुधवारी रात्री भूस्खलनामुळे दिबांग व्हॅली जिल्हा मुख्यालय – हुनली आणि एनेनी दरम्यानचा रस्ता खराब झाला आणि सीमावर्ती जिल्ह्याचा संपर्क मुख्य भूभागापासून तुटला आहे. वाहतूक पूर्ववत होण्यास काही दिवस लागतील. गुरुवारी सायंकाळपर्यंत लहान वाहने रस्त्यावरून जाऊ देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. ‘‘हा रस्ता दिबांग व्हॅलीला देशाच्या इतर भागाशी जोडत असल्याने लवकरात लवकर संपर्क पूर्ववत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत,’’ असे त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
24.2 ° C
24.2 °
24.2 °
62 %
1.8kmh
0 %
Thu
30 °
Fri
32 °
Sat
33 °
Sun
33 °
Mon
33 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!