27.3 C
New Delhi
Thursday, July 31, 2025
Homeमनोरंजनअनपेक्षित प्रवासाची कथा उलगडणाऱ्या ‘जर्नी’ चित्रपटाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित

अनपेक्षित प्रवासाची कथा उलगडणाऱ्या ‘जर्नी’ चित्रपटाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित

एका अनोख्या लढाईची कथा सांगणाऱ्या ‘जर्नी’ या चित्रपटाचा रहस्यमय ट्रेलर प्रदर्शित झाला असून, या ट्रेलरने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढवली आहे. सचिन जीवनराव दाभाडे यांची निर्मिती व दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात एक गूढ कथा अनुभवायला मिळणार आहे. ‘सचिन दाभाडे फिल्म्स’च्या बॅनर अंतर्गत या चित्रपटात शंतनु मोघे, शर्वरी जेमेनिस, शुभम मोरे, अंजली उजवणे, योगेश सोमण, ओमकार गोवर्धन, सुनील गोडबोले, मिलिंद दास्ताने, माही बुटाला, आणि निखिल राठोड हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

चित्रपटाची कथा स्वतः सचिन दाभाडे यांनी लिहिली असून, संवाद आणि पटकथेचे लेखन रवींद्र मठाधिकारी यांनी केले आहे. चित्रपटाचे सहनिर्माते भास्कर देवेंग्रेकर, तानाजी माने, संतोष राठोड आणि अनिकेत अरविंद बुटाला आहेत.

ट्रेलरमध्ये एक लहान मुलगा अचानक बेपत्ता होतो, ज्यामुळे त्याचे पालक चिंतेत पडतात आणि त्याला शोधण्यासाठी अथक प्रयत्न करतात. हा मुलगा कुठे आहे? त्याला कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते? आणि त्याचा प्रवास काय वळण घेईल? या सर्व प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना २९ नोव्हेंबरला चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर मिळणार आहेत.

दिग्दर्शक सचिन दाभाडे म्हणतात, ‘’जर्नी हा सिनेमा हा खरा आजच्या जनरेशनचा फॅमिली सिनेमा आहे, प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त असताना नात्यात जो दुरावा वाढत जात आहे, तो या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. सिनेमात घडलेल्या एका अनपेक्षित प्रसंगामुळे प्रत्येकास नकळत झालेल्या चुकांची जाणीव होते. निमित्त १४ वर्षाचं लेकरू जेव्हा हरवत तेव्हा घरातील प्रत्येकाची काय व्यथा होते त्याला शोधण्यासाठी काय पराकाष्ठा करावी लागते आणि मग विचार येतो की, आपण कुठे कमी पडलो का? या सिनेमात प्रत्येक कलाकाराची मुख्य भूमिका आहे, अर्थात प्रत्येक घरातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी बनलेला हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल.’’

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
27.3 ° C
27.3 °
27.3 °
91 %
4.2kmh
100 %
Wed
27 °
Thu
33 °
Fri
35 °
Sat
35 °
Sun
34 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!