25.1 C
New Delhi
Wednesday, March 18, 2026
Homeमनोरंजनएक फ्लॅट, दोन कुटुंब आणि तुफान राडा!

एक फ्लॅट, दोन कुटुंब आणि तुफान राडा!

‘सुपर डुपर’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये सहकुटुंब सहपरिवार बघता यावा अशा धमाल मनोरंजनाची मेजवानी असणाऱ्या सुपर डूपर या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. नावाप्रमाणेच हा ट्रेलरही सुपर डुपर झाला असून यात एकमेकांवर कुरघोडी करणारे एकाहून एक मातब्बर कलाकार बघून हा चित्रपट पैसा वसूल करणारा ठरेल  अशी प्रतिक्रिया प्रेक्षक देत आहेत. झी स्टुडिओज प्रस्तुत, नाईंटी नाइन प्रॉडक्शन्स आणि सिद्धिविनायक प्रॉडक्शन्स निर्मित तथा समीर आशा पाटील दिग्दर्शित सुपर डुपर हा चित्रपट येत्या ३ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 

नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर एका दिमाखदार सोहळ्यात प्रदर्शित करण्यात आला.
ट्रेलरमध्ये एका घराभोवती फिरणारा गंमतीदार गोंधळ दिसत आहे. एका बाजूला परंपरा जपणारे गावाकडचे  कुटुंब, तर दुसऱ्या बाजूला आधुनिक विचारांची कास धरणारी शहरातलं तरुण जोडपं. या दोन्ही कुटुंबांना एकाच फ्लॅटची विक्री होते आणि या घराच्या ताब्यावरून वादाची ठिणगी पडते. आता एकच घर आणि राहणारे दोन टोकाचे गट… दोघांची जीवनशैली, सवयी आणि विचार अगदी वेगळे असल्यामुळे एकत्र राहतानाची त्यांची मजेशीर जुगलबंदी ट्रेलरमध्ये दिसत आहे.

दरम्यान, या सगळ्या गोंधळात ‘झाड उगायला माती आणि माणूस जगायला नाती लागतातच’ हा निर्मिती सावंत यांच्या तोंडी असलेला भावस्पर्शी संवादही ट्रेलरमध्ये लक्ष वेधून घेतो. विनोद, नात्यांमधली ऊब आणि भावनिक क्षण यांचा सुंदर मेळ यात दिसून येतो. 

नाईंटी नाईन प्रॉडक्शन्स आणि सिद्धिविनायक प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन समीर आशा पाटील यांनी केले आहे. विजय शिंदे आणि नरेश बोर्डे हे या चित्रपटाचे निर्माते असून उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर प्रस्तुतकर्ते आहेत. तर छायांकन संजय जाधव यांनी केले आहे. निर्मिती सावंत, शशांक शेंडे, हृषिकेश जोशी, नम्रता संभेराव, कुशल बद्रिके, प्रतीक्षा कोते यांच्यासह ललित प्रभाकर आणि विदुला चौगुले हे कलाकार या चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत.

या ट्रेलर लाँच प्रसंगी दिग्दर्शक समीर आशा पाटील म्हणाले, ‘’ ‘सुपर डुपर’ हा केवळ विनोदी चित्रपट नाही, तर नात्यांमधल्या गंमतीजमती आणि त्यामागची भावनिक बाजू दाखवणारा प्रवास आहे. दोन पूर्णपणे वेगळ्या स्वभावाची कुटुंबं एकाच घरात राहायला लागली की, किती गंमतीशीर प्रसंग घडू शकतात, हे आम्ही हलक्या-फुलक्या पद्धतीने मांडलं आहे. ट्रेलरमधून त्याची फक्त झलक पाहायला मिळते. परंतु चित्रपटात प्रेक्षकांना हास्य, गोंधळ आणि नात्यांची ऊब असा सगळाच अनुभव मिळेल, असा आमचा विश्वास आहे.”

झी स्टुडिओज् मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणाले की, ” प्रेक्षकांची मनोरंजनाची भूक लक्षात घेऊन त्यांना आवडेल अशीच मेजवानी देणारा हा चित्रपट आहे. एकाहून एक मातब्बर कलाकार यात बघायला मिळणार असून प्रेक्षकांना हसवण्याबरोबरच , त्यांना भावनिक करणारा आणि प्रसंगी अंतर्मुखही करणारा हा चित्रपट आहे. संपूर्ण कुटुंबाने चित्रपटगृहात एकत्र येऊनच अनुभवावा असा हा चित्रपट झाला आहे.  यामुळेच, यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत सर्वांना एक खास कौटुंबिक महासोहळा अनुभवायला मिळेल, असा आम्हाला विश्वास आहे.’’

३ एप्रिलपासून ‘सुपर डुपर’ प्रेक्षकांच्या मनावर कब्जा करण्यासाठी सज्ज होणार आहे. यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक धमाल कौटुंबिक महासोहळा ठरणार, यात शंका नाही.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
25.1 ° C
25.1 °
25.1 °
53 %
1.5kmh
53 %
Wed
34 °
Thu
32 °
Fri
25 °
Sat
31 °
Sun
34 °

Most Popular

Recent Comments