26.8 C
New Delhi
Tuesday, August 26, 2025
Homeमनोरंजन'नंबर कारी' गाण्याच्या पोस्टरचे थाटात अनावरण

‘नंबर कारी’ गाण्याच्या पोस्टरचे थाटात अनावरण

२८ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला

रॅपर किंग शुभम कोळी ऊर्फ एम सी गावठी याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शुभम कोळी याच्या जीवनावर आधारित असलेलं ‘नंबर कारी’ हे गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.’नंबर कारी’ गाण्याच्या पोस्टरचा अनावरण सोहळा नुकताच पत्रकार भवन, सदाशिव पेठ, पुणे येथे थाटात पार पडला. या सोहळ्यास बिलीव आर्टिस्ट सर्व्हिसची टीम आणि अलिरेस्ट्रिक टॅलेंट मॅनेजमेंट टीम उपस्थित होती. तसेच अनेक सोशल मिडिया स्टार देखील या कार्यक्रमात हजर होते.

या गाण्याद्वारे पहिल्यांदाच शुभम कोळी याची लाईफ स्टाईल, त्याने आतापर्यंत घेतलेले अनुभव आणि त्याच्या दैनंदिन जीवनातील घडामोडी त्याच्या चाहत्यांना अनुभवता येणार आहेत. त्यामुळे चाहत्यांना शुभमची नव्याने ओळख पटणार आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

आपल्या नवीन गाण्याबद्दल शुभम सांगतो, या माझ्या स्पेशल गाण्यासाठी मी फार उत्सुक आहे. पहिल्यांदाच मी एवढा मोठा प्रोजेक्ट करतोय. नंबर कारी हे गाणं माझ्या जवळचं आहे. या प्रोजेक्टसाठी मी खुप मेहनत घेतली आहे. माझ्या भावना मी या गाण्याद्वारे व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. हा नवीन प्रोजेक्ट सुरू करताना सगळ्या गोष्टी मी बारकाईने केल्या आहेत. संगीत आणि माझ्या गाण्याचा व्हिडीओ परिपूर्ण कसा होईल याकडे मी लक्ष दिलं आहे. माझ्या चाहत्यांना यावेळी वेगळं आणि नवीन पाहायला मिळावं यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे. चाहते गाण्याला भरभरून प्रेम देतील अशी आशा त्याने व्यक्त केली आहे. माझी नव्याने ओळख पटवून घेण्यासाठी गाणं जरुर पाहा असे आवाहन शुभम याने आपल्या चाहत्यांना केले आहे.

व्हिडीओसाठीचं मार्गदर्शन आणि एडिटिंग ‘सिनेव्होल्युशन’ टीमने केले आहे. तर संगीत ‘अंदाधुन’ या संगीत निर्मात्याचे आहे. हे गाणं २८ मे रोजी सर्वत्र प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
26.8 ° C
26.8 °
26.8 °
87 %
5kmh
100 %
Mon
26 °
Tue
34 °
Wed
35 °
Thu
36 °
Fri
29 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!