30.5 C
New Delhi
Sunday, July 6, 2025
Homeमनोरंजनरिया चक्रवर्ती तिच्या आयुष्याचा दुसरा अध्याय सुरू करणार

रिया चक्रवर्ती तिच्या आयुष्याचा दुसरा अध्याय सुरू करणार

मुंबई- अभिनेत्री रिया चक्रवर्तीसाठी गेली काही वर्षे खूप खडतर गेली होती. तिला सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांनी रियाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. यानंतर ती अंमली पदार्थाशी संबंधित प्रकरणात अटकेत होती. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो नं तिची कसून चौकशी केली. सुशांतच्या मृत्यूच्या तपासादरम्यान रियासंबंधित अनेक गोष्टी समोर आल्या. यानंतरही तिच्या आयुष्यात काही ना काही समस्या निर्माण होत राहिल्या.
रिया चक्रवर्तीनं शेअर केले फोटो : दरम्यान तिच्या आयुष्यात आनंदाचे आगमन होणार आहे. नुकतेच तिच्या इन्स्टा पोस्टमध्ये एक हिंट देण्यात आली आहे. रिया चक्रवर्तीनं तिचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये रिया लाल आणि पांढऱ्या रंगाच्या बॅकलेस ड्रेसमध्ये समुद्र किनाऱ्यावर फोटोसाठी पोझ देताना दिसत आहे. दुसऱ्या एका फोटोमध्ये ती सूर्यास्ताचा आनंद लुटताना दिसत आहे. हे सुंदर फोटो शेअर करताना रियानं लिहिलं, ”हॅशटॅग चॅप्टर २.” यावर तिनं फ्लॉवर, हार्ट आणि इंद्रधनुष्य इमोजी पोस्ट केले आहेत. आता रिया तिच्या आयुष्याच्या दुसऱ्या टप्प्यावर पोहोचली असल्याचं दिसत आहे.
रियाबद्दल पसरल्या होत्या अफवा : आता हा इशारा तिच्या लग्नाशी किंवा नात्याशी संबंधित असू शकते, मात्र सध्या याबाबत काहीही पुष्टी झालेली नाही. गेल्या वर्षी रिया तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होती. तिचं नाव उद्योगपती निखिल कामथ यांच्याशी जोडलं गेलं होतं. ती एका बिझनेसमनला डेट करत असल्याच्या बातम्या मीडियामध्ये आल्या होत्या. रिया आणि निखिल दोघंही अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. यानंतर दोघांनीही याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान रियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तिने हिंदी चित्रपटसृष्टीत ‌’मेरे डॅड की मारुती‌’ या चित्रपटाद्वारे पदार्पण केले होते. या चित्रपटामध्ये ती जसलीनच्या भूमिकेत दिसली होती.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
scattered clouds
30.5 ° C
30.5 °
30.5 °
72 %
2.5kmh
46 %
Sat
30 °
Sun
37 °
Mon
32 °
Tue
37 °
Wed
36 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!