29.6 C
New Delhi
Saturday, October 11, 2025
Homeमनोरंजनलाईक आणि सबस्क्राईब'मधून जुई भागवतचे रुपेरी पडद्यावर पदार्पण

लाईक आणि सबस्क्राईब’मधून जुई भागवतचे रुपेरी पडद्यावर पदार्पण

काही दिवसांपूर्वीच सोशल मिडीयावर एका चित्रपटाचे उत्सुकता वाढवणारे पोस्टर झळकले होते. ‘लाईक आणि सबस्क्राईब’ असे नाव असलेल्या या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये अमृता खानविलकर, अमेय वाघ आणि आणखी एक चेहरा झळकला होता. काहींनी हा चेहरा ओळखला. तर काहींना हा नवीन चेहरा कोणाचा, असा प्रश्न पडला होता. तर ही अभिनेत्री आहे, ‘तुमची मुलगी काय करते?’ या मालिकेत महत्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या जुई भागवतचा. ‘लाईक आणि सबस्क्राईब’ च्या माध्यमातून जुई मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. जुई एक उत्तम नर्तिका आणि गायिकाही आहे.

आपल्या चित्रपटातील पदार्पणाबद्दल जुई भागवत म्हणते, ” माझी आई एक उत्तम अभिनेत्री आहे, सूत्रसंचालिका आहे. त्यामुळे बालपणापासूनच माझ्यावर नकळत अभिनयाचे संस्कार होत गेले. याआधीही मी एका मालिकेत बालकलाकाराचे काम केले होते,. एका शोमध्येही सहभागी झाले होते. मालिका केली. आता ‘लाईक आणि सबस्क्राईब’मधून मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाले आहे. यातील माझी भूमिका खूपच वेगळी असून हा एक रहस्यमय चित्रपट आहे. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी खूप जास्त उत्सुक आहे. चित्रपटाची कथा एकदम जबरदस्त आहे, त्यात पदार्पणात अशा कलाकारांसोबत, टीमसोबत काम करण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. संपूर्ण टीमकडून बऱ्याच गोष्टी शिकता आल्या. एका नवोदिताला आणखी काय हवे असते?

नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत, आणि अभिषेक मेरूकर प्रॉडक्शन्स यांच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य, अभिषेक मेरूकर निर्माते असून ‘लाईक आणि सबस्क्राईब’चे लेखन आणि दिग्दर्शन अभिषेक मेरूकर यांनी केले आहे. यात अमेय वाघ, जुई भागवत, अमृता खानविलकर, शुभंकर तावडे, विठ्ठल काळे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. येत्या १८ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
29.6 ° C
29.6 °
29.6 °
28 %
2.5kmh
0 %
Sat
30 °
Sun
32 °
Mon
33 °
Tue
33 °
Wed
33 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!