34.5 C
New Delhi
Saturday, July 5, 2025
Homeमनोरंजनया अभिनेत्रीला झाली Covid-19 ची लागण...!

या अभिनेत्रीला झाली Covid-19 ची लागण…!

covid news- मुंबई: कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट जगभरात  थैमान घालताना दिसत आहे. भारतातही कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत असून,  बॉलिवूडच्या कलाकारांनाही त्याची लागण होताना दिसून येत आहे. कारण यापूर्वी नोरा फतेही,  अर्जुन कपूर नंतर आता अभिनेत्री शिल्पा शिरोडकरलाही करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शिल्पा शिरोडकरने याबाबत इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.

अलीकडेच हिंदी ‘बिग बॉस’मध्ये झळकलेल्या शिल्पा शिरोडकरने आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सांगितले की, तिने कोरोनाची चाचणी केली होती, जी पॉझिटिव्ह आली. तसेच ती गेली चार दिवस क्वारंटाईनमध्ये असल्याचे देखील तिने सांगितले.

शिल्पा शिरोडकरने पोस्ट शेअर करताना लिहिले की, ‘नमस्कार मित्रांनो! माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तुम्ही सर्वजण सुरक्षित राहा आणि मास्क घाला.” शिल्पाच्या या पोस्टवर लोक कमेंट करत आहेत आणि तिच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.

सिंगापूरमध्ये कोविड-१९ च्या रुग्णांची संख्या पुन्हा वाढली

सिंगापूरच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले की, देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. असे असले तरी, सध्या देशात पसरणारा प्रकार मागील प्रकारांपेक्षा जास्त संसर्गजन्य नाही. आरोग्य मंत्रालय (MOH) आणि संसर्गजन्य रोग एजन्सी (CDA) यांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, २७ एप्रिल ते ३ मे २०२५ दरम्यान कोविड-१९ चे सुमारे १४,२०० नवीन रुग्ण आढळले, जे मागील आठवड्यात सुमारे ११,१०० इतके होते

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
broken clouds
34.5 ° C
34.5 °
34.5 °
54 %
1.6kmh
61 %
Sat
34 °
Sun
38 °
Mon
31 °
Tue
37 °
Wed
32 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!