27.1 C
New Delhi
Friday, September 19, 2025
Homeमनोरंजनसमृद्ध कलेचा वारसा पुरातन त्रिशुंड गणेश मंदिराच्या प्रांगणातआंतरराष्ट्रीय नृत्य दिनाच्या पूर्वसंध्येला नटरंग...

समृद्ध कलेचा वारसा पुरातन त्रिशुंड गणेश मंदिराच्या प्रांगणातआंतरराष्ट्रीय नृत्य दिनाच्या पूर्वसंध्येला नटरंग ॲकॅडमीच्या कलाकारांचा नृत्याविष्कार

साईनाथ मंडळ ट्रस्ट व श्री त्रिशुंड मयुरेश्वर विजय मंडळ ट्रस्ट यांचा उपक्रम

पुणे : भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा जनतेसमोर यावा, वारशाचे जतन व्हावे या हेतूने आंतरराष्ट्रीय (kathak)नृत्य दिनाच्या पूर्वसंध्येला सोमवार पेठेतील सुमारे 300 वर्षे जुन्या श्री त्रिशुंड गणपती मंदिराच्या प्रांगणात नटरंग ॲकॅडमीच्या युवा कलाकारांनी भरतनाट्यम नृत्याविष्कार सादर केला.
दि. 29 एप्रिल हा आंतरराष्ट्रीय नृत्य दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्ट आणि सोमवार पेठेतील श्री त्रिशुंड मयुरेश्वर विजय मंडळ ट्रस्ट यांनी संयुक्त विद्यामाने या नृत्याविष्काराचे आयोजन केले होते. कार्यक्रमाची संकल्पना साईनाथ मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष पियूष शहा यांची होती. ज्येष्ठ भरतनाट्यम नृत्यगुरू स्वाती दातार, शाहीर हेमंत मावळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
त्रिपुंड या नृत्याविष्काराचे नृत्य दिग्दर्शन प्रणव कडेकर यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने झाली. शिवपार्वती आलारिपू सादर करून वृंदावनी वेणू या अभंगावर नृत्याविष्कार सादर करण्यात आला.
उपस्थितांशी संवाद साधताना डॉ. स्वाती दातार म्हणाल्या, समर्पण भावनेतून कलाकार कला सादर करतात तर रसिक कलेला मोठे करतात. पूर्वीच्या काळी मंदिरांमध्येच कलांचे सादरीकरण व्हायचे. ही परंपरा येथे सुरू झाल्याचा आनंद आहे. नृत्याच्या क्षेत्रात 40 वर्षे योगदान दिल्याबद्दल डॉ. दातार यांचा शाहीर मावळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
समृद्ध वारसा असलेल्या मंदिराच्या प्रांगणात भारतीय नृत्यकला सादर केली जावी आणि सांस्कृतिक ठेव्याचे जतन केले जावे या हेतूने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे पियूष शहा यांनी प्रास्ताविकात सांगितले.
त्रिशुंड गणपती मंदिराचे विश्वस्त नंदू हंबीर, राजेंद्र जाधव, नितीन धायरकर, तसेच दोन्ही मंडळांचे कार्यकर्ते पियूष शहा, सचिन पवार, सचिन लांडगे, नरेंद्र व्यास, महेश सूर्यवंशी, विश्वास भोर, गंधाली शहा, अनिल दिवाणजी, अभिषेक मारणे, किरण सोनीवाल, नितीन पंडित , विद्याताई म्हेत्रे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जतिन पांडे यांनी केले तर आभार सचिन पवार यांनी मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
27.1 ° C
27.1 °
27.1 °
89 %
1.5kmh
40 %
Fri
34 °
Sat
38 °
Sun
38 °
Mon
38 °
Tue
38 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!