23.1 C
New Delhi
Thursday, October 30, 2025
Homeमनोरंजनमनवा आणि श्लोकच्या केमिस्ट्रीची धमाल झलक

मनवा आणि श्लोकच्या केमिस्ट्रीची धमाल झलक

‘‘मना’चे श्लोक’चा भन्नाट टीझर प्रदर्शित

‘‘मना’चे श्लोक’ या चित्रपटाचा जबरदस्त टीझर नुकताच प्रेक्षकांसमोर आला आहे. काही दिवसांपूर्वी पोस्टर प्रदर्शित झाले होते आणि तेव्हापासून प्रेक्षक या चित्रपटाची वाट पाहात होते. आता टीझर येताच चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत.

टीझरमध्ये आजच्या तरुण पिढीची नाती, त्यांचे विचार दाखवले आहेत. मनवा आणि श्लोक ही दोन वेगवेगळी पात्रं विशेष आकर्षण ठरत आहेत. मनवा ही धाडसी आणि बिनधास्त मुलगी आहे, तर श्लोक हा शांत आणि समंजस मुलगा आहे. त्यांच्यातील संवाद चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवणारे आहेत. हे दोन भिन्न स्वभावाचे लोक जेव्हा एकत्र येतात, तेव्हा त्यांच्या प्रेमकथेत काय घडतं, हे जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.

चित्रपटात मृण्मयी देशपांडे, राहुल पेठे, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे आणि करण परब असे कलाकार आहेत.

दिग्दर्शिका मृण्मयी देशपांडे म्हणते, “हा माझ्यासाठी खास चित्रपट आहे. माझ्या मनाजवळचाच हा चित्रपट आहे, असं म्हटलं तरी चालेल. मनवा आणि श्लोकचा हा प्रवास प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच आवडेल.”

प्रस्तुतकर्ते नितीन वैद्य म्हणतात, “हा चित्रपट प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव देईल. मुळात हा एक कौटुंबिक चित्रपट असल्याने यातील व्यक्तिरेखा आपल्याच घरातील वाटतील.’

निर्माते संजय दावरा म्हणाले, “या चित्रपट प्रेक्षकांना मनोरंजनच करेल, कथा, कलाकार, दिग्दर्शन अशा सगळ्याच गोष्टी खूप छान जुळून आल्या आहेत.’’

‘मना’चे श्लोक’ हा चित्रपट १० ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. याचे लेखन आणि दिग्दर्शन मृण्मयी देशपांडे यांनी केले असून निर्माते श्रेयश जाधव आणि संजय दावरा आहेत. हा चित्रपट स्टारलाईट बॉक्स थिएटर्स आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन्स यांच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
23.1 ° C
23.1 °
23.1 °
78 %
0kmh
75 %
Wed
27 °
Thu
30 °
Fri
31 °
Sat
32 °
Sun
33 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!