सामाजिक कार्यकर्त्यां स्मिता गद्रे यांची मध्यवर्ती भूमिका
पुणे,- : ” अभिनय कारकीर्द सुरू करण्यासाठी कधीही उशीर झालेला नसतो. जेव्हा आणि जिथे शक्य असेल तिथे कृती करा. कास्टिंग कॉल्सना प्रतिसाद दया आणि ऑडिशनला उपस्थित राहा. सुरूवातीच्या कारकिर्दीच्या अभिनेत्यासाठी व्यावसायिक अनुभव निर्माण करणे आवश्यक आहे.” असा सल्ला राष्ट्रीय फिल्म पुरस्कार विजेता दिग्दर्शक सुनील शिंदे यांनी नवोदित कलाकारांना दिला.
लेखक व दिग्दर्शक सुनील शिंदे हे ‘सुताड’ (sutad) हा नवा चित्रपट प्रेक्षकांसाठी लवकरच घेऊन येणार आहेत. त्या संदर्भात ते पुण्यात आले असतांना त्यांनी चित्रपट सृष्टी संदर्भातील वास्तविक दर्शन घडविले. ‘सुताड’ चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक सुनील शिंदे, सहयोग दिग्दर्शक देवकुमार व सामाजिक कार्यकर्त्यां अभिनेत्री स्मिता गद्रे यांच्या हस्ते या चित्रपटाची स्क्रीप्ट आणि पोस्टरचे लॉन्चिंग करण्यात आले. या वेळी निवोदित कलाकरांना समजावून सांगतांना त्यांनी आपली भावना व्यक्त केली.

या चित्रपटात डॉ. काशीनाथ घाणेकर यांची पुतणी व गेल्या ३० वर्षापासून पिंपरी चिंचवड येथील कला व सामाजिक क्षेत्रात कार्यरत स्मिता गद्रे या मध्यवर्ती भूमिका साकार करतांना दिसणार आहेत.
आपली भावना व्यक्त करतांना स्मिता गद्रे म्हणाल्या,” अभिनय हा माझ्या रक्ता रक्ता भिनलेला आहे. संसाराचा गाडा ओढतांना या कले कडे थोडे दुर्लक्ष झाले होते. माझ्यातील अभिनय व कलेच्या गुणवत्तेमुळे या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका मिळाली आहे हे अभिमानास्पद आहे. या पूर्वी अनेक नाटक व डॉक्यूमेंट्री मध्ये अभिनय साकार केला आहे.”
योग्य कलाकारांच्या निवडीसाठी या चित्रपटाने प्रत्येक ठिकाणी पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. दिग्दर्शक शिंदे यांनी एक छान कौटुंबिक कथा या चित्रपटाच्या स्वरूपात मांडली आहे. एकत्र कुटुंब पद्धतीतील नाती गोती ही आजच्या काळात अत्यंत महत्वाच्या वळणावर आहे. हा संदेश प्रेक्षकांपर्यत पोहचविण्यासाठी चित्रपटाची शुटिंग लवकरच सुरू होईल.
चित्रपटाची स्क्रिप्ट आणि पोस्टच्या लॉन्चिंग सोहळ्यानंतर आता ‘सुताड’ सिनेताच्या टीमने चित्रपटाची जोरदार प्रसिद्धी सुरू केली आहे. एकंदरीत पाहता हा चित्रपट केवळ प्रेक्षकांना सिनेमागृहापर्यंत खेचून आणणार नाही, तर त्यांच्या मनात कायमच घर करेल यात शंका नाही. आयुष्याकडे बघण्याचा अगदी वेगळा विचार ‘सुताड’ लवकरच घेऊन येत आहे.