33.7 C
New Delhi
Wednesday, July 16, 2025
Homeमनोरंजनराजश्री एंटरटेन्मेंटच्या 'पाणी'ने २५ पुरस्कारांवर उमटवली मोहोर

राजश्री एंटरटेन्मेंटच्या ‘पाणी’ने २५ पुरस्कारांवर उमटवली मोहोर

सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक सर्वाधिक पुरस्कार

राजश्री एंटरटेनमेंटने आता ‘पाणी’ या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला असून त्यांनी पर्पल पेबल पिक्चर्स आणि कोठारे व्हिजन प्रा. लि. यांच्या सहकार्याने ‘पाणी’ची निर्मिती केली आहे. राजश्री एंटरटेनमेंटचा हा पहिलाच मराठी चित्रपट असून त्यांनी पदार्पणातच इतिहास रचला आहे. आदिनाथ कोठारे दिग्दर्शित हा चित्रपट मराठवाड्याच्या ‘जलदूत’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हनुमंत केंद्रे यांच्या जीवनावर आधारित आहे. हा केवळ एक बायोपिक नसून समाजाला पाण्याचे महत्त्व पटवून देणारा एक सशक्त आणि संवेदनशील चित्रपट आहे. ‘पाणी’ने आजवर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार, विविध पुरस्कार सोहळ्यांमध्ये २५ मानाचे पुरस्कार पटकावले आहेत. यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक अशा प्रमुख विभागांचा समावेश आहे. या यशामुळे ‘पाणी’ हा चित्रपट वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेला मराठी चित्रपट ठरला आहे.

चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटाला ‘पर्यावरण संरक्षण/संरक्षणावरील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म’साठी ‘६६ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ देण्यात आला. तर न्यूयॉर्क फिल्म फेस्टिवलमध्ये आदिनाथ कोठारे याला सर्वोत्कृष्ट कलाकाराचा पुरस्कार मिळाला. नुकत्याच झालेल्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात ‘पाणी’ ला सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट, पटकथा, सर्वोत्कृष्ट संकलन, सर्वोत्कृष्ट साऊंड डिझाईन, सर्वोत्कृष्ट बॅकग्राऊंड स्कोअर या विभागात पुरस्कार मिळाले. झी चित्र पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट गीतकार, सर्वोत्कृष्ट ध्वनिमुद्रण, सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक तर रेडिओ सिटी सिने अवॉर्ड मराठी – सिझन ८ मध्ये सर्वोत्कृष्ट गायक, सर्वोत्कृष्ट चित्रपट हे पुरस्कार पटकावले. म. टा. सन्मानमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट संगीत, सर्वोत्कृष्ट गीतकार असे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. एनडीटीव्ही मराठी अवॉर्ड्समध्ये ‘पाणी’ ने सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट कथा, सर्वोत्कृष्ट संकलन विभागात बाजी मारली.

दिग्दर्शक आदिनाथ कोठारे यांनी आपल्या भावना व्यक्त करत म्हटले, “या यशाचे श्रेय संपूर्ण टीम आणि प्रेक्षकांना जाते. प्रेक्षकांनी आम्हाला जे प्रेम दिलं, त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. नेहा बडजात्या, प्रियांका चोप्रा जोनस, डॉ. मधू चोप्रा, सिद्धार्थ चोप्रा यांचे मनापासून धन्यवाद. त्यांच्यामुळेच आज हे शक्य होऊ शकले.”

ज्यांना ‘पाणी’ चित्रपटगृहात पाहायची संधी मिळाली नाही, त्यांना हा चित्रपट आता अमेझॉन प्राईमवर मराठीसह हिंदी भाषेतही उपलब्ध आहे. सामाजिक विषयावर आधारित असला तरी, या चित्रपटात मनोरंजन, संगीत, आणि उत्तम अभिनयाची त्रिवेणी अनुभवता येणार आहे.

आदिनाथ कोठारे दिग्दर्शित ‘पाणी’ चित्रपटात आदिनाथ कोठारे, रुचा वैद्य, सुबोध भावे, रजित कपूर, किशोर कदम, नितीन दीक्षित, सचिन गोस्वामी, मोहनाबाई, श्रीपाद जोशी, विकास पांडुरंग पाटील अशी तगडी स्टारकास्ट आहे. या चित्रपटाची कथा नितीन दीक्षित आणि आदिनाथ कोठारे यांची असून नेहा बडजात्या, दिवंगत रजत बडजात्या, प्रियांका चोप्रा जोनस, डॉ. मधू चोप्रा या चित्रपटाचे निर्माते आहेत तर महेश कोठारे, सिद्धार्थ चोप्रा या चित्रपटाचे सहयोगी निर्माते आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
33.7 ° C
33.7 °
33.7 °
49 %
4.5kmh
100 %
Wed
37 °
Thu
33 °
Fri
35 °
Sat
37 °
Sun
39 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!