मुंबई – मुंबईतील रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याचा प्रस्ताव पावसाळी अधिवेशनात मंजूर करण्यात आला. नावे बदलण्यास परवानगीसाठी आता प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. मंत्री दादा भुसे यांनी सभागृहात रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा प्रस्ताव मांडला. करी रोड, सँडहर्स्ट, मरीन लाइन्स, चर्नी रोड, कॉटन ग्रीन, डॉकयार्ड, किंग्ज सर्कल या स्थानकांची नावे बदलण्यात येणार आहेत.
ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याचा अधिकार राज्य सरकारला असतो. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत याआधी निर्णय घेण्यात आला होता. वेस्टर्न रेल्वे मार्गावरील करीरोड या स्टेशनचे नाव बदलून आता लालबाग करण्यात येणार आहे. सेंट्रल रेल्वे मार्गावरील सँडहर्स्ट या स्टेशनचे नाव बदलून आता डोंगरी असे करण्यात येणार आहे.
कोणत्या स्टेशनचं नाव काय होणार?
करीरोडचे – लालबाग
सँडहर्स्टचे – डोंगरी
मरीन लाईन – मुंबादेवी
चर्णी रोड – गिरगाव
कॉटन ग्रीन- काळाचौक
डॉकयार्ड – माझगाव रेल्वे स्थानक
किंग सर्कल- तिर्थनकर पाश्वनाथ
आता मरीन लाइन्स नव्हे तर ’मुंबादेवी’
मुंबईतील ७ रेल्वेस्थानकांची नावं बदलणार
RELATED ARTICLES
New Delhi
broken clouds
31.5
°
C
31.5
°
31.5
°
60 %
2.2kmh
59 %
Mon
31
°
Tue
38
°
Wed
35
°
Thu
35
°
Fri
35
°