चिंचवड : – चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – आरपीआय (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांच्या विजयासाठी आमदार अश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली रहाटणीतील लाडक्या बहिणी सरसावल्या असून ‘अबकी बार शंकरभाऊ आमदार’चा नारा देत महाविजयाचा निर्धार केला आहे.शंकर जगताप यांच्या प्रचारानिमित्त आमदार अश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली रहाटणी येथील सिंहगड कॉलनी, बळीराज कॉलनी आणि साई सागर कॉलनी याठिकाणी महिला मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला रहाटणी परिसरातील महिलांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या मेळाव्याला मार्गदर्शन करताना अश्विनी जगताप म्हणाल्या की, सर्वसामान्य नागरिकांना डोळ्यासमोर ठेवून स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघात विविध विकासकामे केली. थेरगावचे रुग्णालय असेल, गल्लोगल्ली रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटिकरण असेल, त्याचबरोबर शंकर जगताप यांच्या सहकार्यातून आणि पुढाकारातूनही अनेक विकासकामे झाली आहेत. ही विकासकामे अशीच अखंडितपणे सुरू राहावीत यासाठी शंकर जगताप यांच्यासारख्या उच्चशिक्षित उमेदवाराला यावेळी काम करण्याची संधी द्या. यासाठी येत्या २० तारखेला कमळाला मतदान करा, असे आवाहन त्यांनी उपस्थित महिलांना केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी नगरसेविका सविता खुळे, सामाजिक कार्यकर्त्या सुमन नखाते माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, माजी स्वीकृत सदस्य संदीप नखाते, उमाताई धुमाळ, हेमलता जाधव, रंजना डांगे, लता चौगुले, सविता गटकळ, सविता पिल्लेवान, सुशीला ढेपे, सरिता जगताप, जयश्री माळेकर, लता चौगुले, सुनंदा सुरवसे, साधना पवार, नंदा भोसले, दिपाली नेवसे, मेघा बर्डे, योगिता शेळके, रूपाली कांबळे, मंगल पोटरे, रोहिणी शिंदे, सुषमा इथापे, नीता पवार, नंदा हरपळे , अश्विनी आदलिंगे, दिपाली मोटे, पल्लवी पोटरे ,देवशाला मरे, कांचन डिंबळे, मंदा नखाते, सुरेखा तापकीर ,मीना ढोरे ,शशिकला मोहिते, मा स्वीकृत सदस्य गोपाळ माळेकर, देविदास तांबे, संतोष जगताप, गणेश नखाते, नरेश खुळे, दीपक जाधव, सुदाम डांगे, तानाजी चौगुले सुरेश पवार, राजेंद्र बोराडे यांनी विशेष प्रयत्न केले.
आमदार अश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली रहाटणीत महिला मेळाव्यांचे आयोजन
मेळाव्यात लाडक्या बहिणींचा एकच निर्धार; 'अबकी बार शंकरभाऊ आमदार'
RELATED ARTICLES
New Delhi
clear sky
11.5
°
C
11.5
°
11.5
°
45 %
2.2kmh
0 %
Thu
19
°
Fri
21
°
Sat
21
°
Sun
20
°
Mon
17
°


