20.1 C
New Delhi
Sunday, November 24, 2024
Homeमहाराष्ट्रइयत्ता दहावीच्या परीक्षेत केला मोठा बदल

इयत्ता दहावीच्या परीक्षेत केला मोठा बदल

गणित आणि विज्ञान या विषयांमध्ये 35 ऐवजी 20 किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळाले तरी पास

पुणे –

आता दहावीच्या विद्यार्थ्यांना टेन्शन घ्यायचं कारण नाही. कारण महाराष्ट्र बोर्डाने इयत्ता दहावीच्या परीक्षेत मोठा बदल केला आहे. विद्यार्थ्यांना यापुढे गणित आणि विज्ञान या विषयांमध्ये 35 ऐवजी 20 किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळाले तरी त्यांना अकरावीत प्रवेश मिळणार आहे. नव्या अभ्यासक्रम आराखड्यात यासंदर्भात तरतूद करण्यात आली आहे.

दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेत गणित आणि विज्ञान या विषयांमध्ये 35 पेक्षा कमी आणि 20 पेक्षा जास्त गुण मिळाले, तरी असा विद्यार्थी आता पुढील शिक्षण घेऊ शकणार आहे. परंतु त्यांच्या रिझल्टवर एक विशिष्ट शेरा दिला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता दोन पर्याय समोर असणार आहे. एक पर्याय म्हणजे प्रमाणपत्र घेऊन अकरावीसाठी प्रवेश घेणे किंवा तीच परीक्षा परत एकदा देणे.

मात्र, हा पर्याय त्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे, ज्यांना पुढे गणित किंवा विज्ञान या दोन्ही विषयांवर आधारीत भविष्यात कोणतेही करिअर करायचे नाही. त्या विद्यार्थ्यांना हा नियम लागू होणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना विज्ञान किंवा गणित हे विषय घेऊन उच्च शिक्षण घ्यायचे नाही त्यांना याचा फायदा होऊ शकतो. यामुळे विद्यार्थ्यांसाठी गणित किंवा विज्ञान विषयाची भिती कमी होणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
20.1 ° C
20.1 °
20.1 °
52 %
1.5kmh
1 %
Sun
28 °
Mon
28 °
Tue
28 °
Wed
27 °
Thu
27 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!