पुणे शहरातील कसबापेठ मतदारसंघातील विधानसभा आता रंगतदार झाली आहे. कॉंग्रेस उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर आणि भाजप उमेदवार हेमंत रासने या प्रमुख पक्षांच्या उमेदवारांच्या मध्ये कॉंगेस मधून बंडखोरी करत उभा असलेल्या माजी महापौर आणि अपक्ष उमेदवार सौ. कमल व्यवहारे यांनी आव्हान उभा केले आहे.
काल त्यांनी आपल्या प्रचार पदयात्रेची सुरुवात सर्व महापुरुषांच्या पुतळ्याला हार घालून केली. म्हसोबा चौक, दत्तवाडी परिसर, शंकर मंदिर परिसर, बुध्दविहार परिसर, मस्जिद परिसर, मांगीरबाबा मंदिर परिसर या ठिकाणी पदयात्रा व कोपरा सभा घेतल्या. त्यावेळी या प्रभागातील नागरिकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत नागरिकांनी केले. कमलताई व्यवहारे यांना आपण मतदान करणार असल्याचे सांगितले. यावेळी प्रचारसभेत बोलताना सौ. कमलताई व्यवहारे म्हणाल्या कि, माझा कसब्याच्या जनतेवर भरोसा आहे. मी ५ वेळा ५ वेगवेगळ्या प्रभागातून उभा राहिले त्यावेळी कसब्यातील नागरिकांनी मला निवडून दिले आहे. प्रस्थापित उमेदवारांनी केवळ निवडून येऊन लोकांना फसवण्याचे काम केले आहे. मी गेली ४० वर्षे लोकांच्या संपर्कात असून, या मतदारसंघातील महिलांचे प्रश्न सोडवणार आहे. त्यामुळे महिला मतदारांनी मला निवडून द्यावे असे त्यांनी सांगितले. कमलताई व्यवहारे यांच्या किटली या चिन्हासमोरील बटन दाबून कमलताई व्यवहारे यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आव्हान त्यांच्या समर्थकांनी केले.
प्रस्थापित पक्षांमध्ये लढाई होईल असे वाटत असताना सौ. कमल व्यवहारे यांनी आणि त्यांच्या किटली या चिन्हाने हवा करून कसब्यातील सुरु झालेली राजकीय हवा आता चांगलीच तापवली आहे. त्यामुळे प्रस्थापित उमेदवारांसमोर कमलताई यांनी आव्हान उभा केले आहे.
कसब्याच्या निवडणुकीत किटलीने भरला रंग!
प्रचार जातोय शिगेला
RELATED ARTICLES
New Delhi
haze
22.1
°
C
22.1
°
22.1
°
46 %
1.5kmh
0 %
Thu
24
°
Fri
27
°
Sat
28
°
Sun
29
°
Mon
29
°