पुणे- ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित श्रावण महोत्सवाचा कोथरुड kothrud विधानसभा मतदारसंघातील महिलांनी मनमुराद आनंद लुटला. या महोत्सवाअंतर्गत कोथरुड मतदारसंघातील महिलांसाठी मंगळागौर स्पर्धा आणि पाककला pakkala स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचा संगता सोहळा शुभारंभ लॉन्स येथे संपन्न झाला. या महोत्सवात ज्येष्ठ महिलांसह लहान मुलींनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
यावेळी प्रसिद्ध अभिनेत्री भार्गवी चिरमुले bhargavi chirmule, भाजपा कोथरुड मंडल अध्यक्ष संदीप बुटाला, प्रसिद्ध शेफ सर्वेश जाधव, मंदार जोग, मगंळागौर mangalgour स्पर्धेच्या परिक्षिका नेहा दांडेकर, सविता जोशी, सुप्रिया ताम्हाणे, तेजस्विनी पिसाळ, यांसह महोत्सवाच्या संयोजिका माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, अँड. मिताली सावळेकर, अमृता देवगावकर, उमा गाडगीळ, अँड. प्राची बगाटे, अस्मिता करंदीकर, हर्षाली माथवड, वृषाली चौधरी, कांचन कुंबरे, अनुराधा एडके, कल्पना पुरंदरे, वर्षा पाटील, जयश्री तलेसरा, मनिषा बुटाला, अनिता तलाठी, अपर्णा लोणारे, विद्या टेमकर, रमा डांगे, गौरी करंजकर, जान्हवी जोशी, अस्मिता आपटे, सुरेखा डाबी, कविता निंबोळकर, समृद्धी वेलणकर यांच्यासह भाजपाच्या सर्व महिला पदाधिकारी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, श्रावण महोत्सवाच्या माध्यमातून सर्व माता-भगिनींचे एकत्रिकरण करुन, त्यांना त्यांचा आनंद साजरा करु देणं हा उद्देश होता. त्यासाठी मंगळागौर आणि पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गणेशोत्सव आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे प्रत्येक घरांमध्ये गौराईचे आगमन होईल. त्यांच्या तयारीत पुन्हा माता भगिनी उत्साहाने सहभागी होतील. त्यांचा हा आनंद पुन्हा द्विगुणित व्हावा, या अनुषंगाने कोथरुड विधानसभा मतदारसंघात गौराई सजावण स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल, अशी घोषणा ही त्यांनी यावेळी केली.
यावेळी प्रसिध्द सिनेअभिनेत्री भार्गवी चिरमुले यांची विशेष मुलाखत अँड मिताली सावळेकर यांनी घेतली. यावेळी त्यांनी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या श्रावण महोत्सवाचे कौतुक केले. यानिमित्ताने महिलांना त्यांचा आनंद साजरा करण्याची संधी मिळाली, अशी भावना व्यक्त केली.
या महोत्सवातील पाककला स्पर्धेत मिना मांडके या प्रमुख विजेत्या ठरल्या. तर स्नेहल टेंबे आणि स्वाती जोशी यांनी प्रथम आणि द्वितीय परितोषिक पटकावले. मंगळागौर स्पर्धेत स्नेहवर्धिनी ग्रुपने मंगळागौर स्पर्धेचा चषक पटकावला.