11.1 C
New Delhi
Thursday, December 5, 2024
Homeमहाराष्ट्रगाफील न राहता विधानसभा विजयासाठी आजपासूनच कामाला लागा – खा.मेधा कुलकर्णी

गाफील न राहता विधानसभा विजयासाठी आजपासूनच कामाला लागा – खा.मेधा कुलकर्णी

पिंपरी चिंचवड शहर भाजपाची विस्तारित जिल्हा कार्यकारिणी अधिवेशन संपन्न

पिंपरी : भाजपाला थांबविण्यासाठी विरोधकांकडून जोरदार ताकद लावली जात आहे, सर्वाधिक वेळा काँग्रेसच्या काळात संविधानात बदल झाले. वफ़फ बोर्डाला सर्वाधिक पॉवर देण्याचा शेवटचा बदल काँग्रेसने २०१३ साली केला.  संविधान बदलण्याची भाषा वापरून काँग्रेस फेक नरेटिव्ह पसरविण्याचे काम करीत आहे, त्यांना त्याच ताकदीने उत्तर देण्याची गरज आहे. त्यामुळे पुढील दोन  तीन महिन्यांच्या कालावधीत गाफीत न राहता जिददीने ‍निवडणुका जिंकण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन राज्यसभा खासदार प्रा.डॉ. मेधा कुलकर्णी यांनी केले. आगामी विधानसभा निवडणुकीत शहरातील तीनही मतदारसंघात महायुतीच्या विजयासाठी मंथन करण्याकरिता भाजपा पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा)च्यावतीने विस्तारित जिल्हा कार्यकारिणी अधिवेशन आज प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. त्यावेळी उपस्थित जिल्हा पदाधिकारी – मंडल अध्यक्ष, बुथ प्रमुख यांना मार्गदर्शन करतात त्या बोलत होत्या.

यावेळी, पश्चिम महाराष्ट्र मकरंद देशपांडे, प्रदेश उपाध्यक्ष अमर साबळे, आमदार विधान परिषद उमाताई खापरे, आमदार महेशदादा लांडगे, चिंचवड विधानसभा अश्विनीताई जगताप, प्रदेशअध्यक्ष भाजयुमो अनुप मोरे, राष्ट्रीय परिषद सदस्य सदाशिव खाडे, माजी महापौर उषा ढोरे, राहूल जाधव, दक्षिण भारत प्रकोष्ठ  राजेश पिल्ले, सरचिटणीस नामदेव ढाके, विलास मडेगिरी, संजय मंगोडेकर, अजय पाताडे, शितल शिंदे, शैला मोळक, वरिष्ठ उपाध्यक्ष तथा प्रवक्ते राजू दुर्गे, चिंचवड विधानसभा विस्तारक काळूराम बारणे, भोसरी विधानसभा विस्तारक विकास डोळस, महिला मोर्चा अध्यक्षा सुजाता पालांडे, युवा मोर्चा अध्यक्ष तुषार हिंगे, ओबीसी मोर्चा अध्यक्ष राजेंद्र राजापूरे, मंडल अध्यक्ष सोमनाथ भोंडवे, संदिप नखाते, प्रसाद कस्पटे, राजेंद्र बाबर, निलेश अष्टेकर, संतोष तापकीर, रामदास कुटे यांच्यासह भाजपाचे प्रदेश पदाधिकारी, माजी नगरसेवक – नगरसेविका, जिल्हा पदाधिकारी, सर्व मोर्चा, आघाडी,  प्रकोष्ठ प्रमुख, मंडल अध्यक्ष,  मंडल पदाधिकारी, शक्तिकेंद्र प्रमुख, बुथ प्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रगीत, दिप प्रज्वलन करून भाजपच्या जिल्हा विस्तारीत कार्यकारिणी अधिवेशनाला सुरुवात झाली. तसेच, शोकप्रस्ताव मांडण्यात आला.

अधिवेशनाचे प्रास्ताविक शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचा आढावा मांडताना पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा कार्यक्षेत्रात भारतीय जनता पक्षाची ताकद वाढली असून, आगामी विधानसभा ‍निवडणूकीतही पक्षाची संपूर्ण ताकद पणाला लावून महायुतीच्या तीनही उमेदवारांना विजयी करणार असल्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त् केला. महिला सबलीकरणासाठी महायुती सरकारने योजना आखल्या आहेत. मुख्यमंत्री लाडकी ‍ बहिण योजनेसाठी १ कोटी ३३ लाख महिला भगिनी योजनेस पात्र ठरल्या आहेत. पिंपरी चिंचवड शहरातून या योजनेसाठी सर्वाधिक अर्ज भरण्यात आले आहे. महिला भगिनींसाठी महायुती सरकारने आणलेल्या लाभाच्या योजना बंद करण्याचा काँग्रेसचा डाव आहे. अभ्यास न करताच विरोधक बोलतात आणि महायुतीच्या योजनांवर आपले स्ट्रीकर लावतात. विरोधकांकडून सूरू असलेल्या निगेटीव्ह नरेटिव्हला प्रत्येकाने उत्तर देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.  

यावेळी, विधान परिषद आमदार अमित गोरखे, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, पिंपरी विधानसभा विस्तारक संजय मंगोडेकर यांची निवड झाल्याबददल अभिनंदनाचा ठराव पारित करण्यात आला. आमदार महेश लांडगे, माजी खासदार अमर साबळे, आमदार उमाताई खापरे, आश्विनीताई जगताप, सदाशिव खाडे, राजेश पिल्ले यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन केले. तसेच, महाराष्ट्र शासनाने केलेल्या मागासवर्गीय योजना, लाडकी बहिण योजना, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये भाजपाने केलेली विकासकामे, नव मतदार नोंदणी अभियान आदी विषयांवर विस्तृत चर्चा केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय मंगोडेकर, अजय पाताडे यांनी केले. आभार राजू दुर्गे यांनी मानले.

शंकर पांडुरंग जगताप 

शहराध्यक्ष : भारतीय जनता पार्टी 

पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
11.1 ° C
11.1 °
11.1 °
66 %
1kmh
0 %
Thu
25 °
Fri
25 °
Sat
25 °
Sun
25 °
Mon
20 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!