31 C
New Delhi
Saturday, October 11, 2025
Homeमहाराष्ट्रछोट्या पडद्यावर रितेश भाऊचे राज्य!

छोट्या पडद्यावर रितेश भाऊचे राज्य!

कलर्स मराठीच्या 'बिग बॉस मराठी'ने रचला नवा विक्रम

‘BIGG BOSS मराठी’, रात्री 9 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य @officialjiocinema वर

कलर्स मराठी’ वाहिनीवर ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन नव्या ढंगात, नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि या सीझनने अल्पावधीतच रेकॉर्ड ब्रेक करायला सुरुवात केली आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनचा मंच रितेश भाऊने दणाणून सोडला आहे. नव्या सीझनमधील रितेश भाऊची लयभारी स्टाईल, नाविन्य, तरुणपण, कल्ला या सर्वच गोष्टी सीझनचा विक्रम रचण्यात कारणीभूत ठरत आहेत. ग्रँड प्रीमियरपासून सुरू झालेली ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच आहे.

लहान मुलं, महिलावर्ग ते आबाल वृद्ध अशा सर्वांनाच ‘बिग बॉस मराठी’ने वेड लावलं आहे. ‘बिग बॉस मराठी’ची आणि रितेश भाऊच्या कमाल होस्टिंगची चाहत्यांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. रितेशच्या ‘भाऊच्या धक्क्या’ने पुन्हा एकदा सर्व रेकॉर्ड्स तोडले आहेत. ‘बिग बॉस मराठी’ या लोकप्रिय रिअॅलिटी शोच्या शनिवारच्या भाऊच्या धक्क्याला 3.7 रेटिंग मिळाले असून रविवारच्या अक्षय कुमार स्पेशल भाऊच्या धक्क्याला 4.0 रेटिंग मिळाले आहे. एकंदरीतच ‘भाऊच्या धक्क्याला’ 3.9 एव्हरेज रेटिंग मिळाले आहे. ‘बिग बॉस मराठी’ने संपूर्ण आठवडा गाजवला आहे. खरंतर ‘बिग बॉस मराठी’ने स्वत:चाच रेकॉर्ड ब्रेक केला आहे. इतर मराठी वाहिन्यांवरील कथाबाह्य कार्यक्रमांना मागे टाकत ‘बिग बॉस मराठी’ने इतिहास रचला आहे.

‘बिग बॉस मराठी’चं बिगुल वाजलं आणि नव्या पर्वाची दिमाखात सुरुवात झाली. महाराष्ट्रातील घराघरांत रात्री 9 च्या ठोक्याला ‘बिग बॉस मराठी’चा नवा सीझन पाहिला जातो. कॉलेजच्या कट्ट्यापासून ते कार्पोरेट ऑफिसपर्यंत सर्वत्र ‘बिग बॉस मराठी’बद्दल चर्चा होताना दिसून येते. ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनसोबत नवी पिढी जोडली जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
31 ° C
31 °
31 °
25 %
3.2kmh
0 %
Sat
31 °
Sun
32 °
Mon
33 °
Tue
33 °
Wed
33 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!