25.1 C
New Delhi
Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्रतुकोबारायांच्या पालखीवर सावली धरण्यासाठी खास चेन्नईहून छत्री 

तुकोबारायांच्या पालखीवर सावली धरण्यासाठी खास चेन्नईहून छत्री 

पुणे-संत तुकाराम महाराजांच्या पालखीसाठी यंदा विशेष छत्री तयार करुन घेण्यात आली आहे. श्री संत तुकाराम महाराजांच्या 339व्या पालखी सोहळ्यासाठी संस्थानच्या वतीनं नवी वेलवेटची छत्री बनवण्यात आली आहे. पुण्याच्या भवानी पेठ येथील विठ्ठल मंदिराचे सेवेकरी राजेश भुजबळ आणि त्यांच्या मित्रमंडळींनी तुकोबारायांच्या पालखीवर सावली धरण्यासाठी खास चेन्नईहून ही छत्री तयार करून घेतली आहे. 

आषाढी वारी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. आज रोजी संत तुकाराम महाराजांची पालखीचे प्रस्थान झाले आहे. त्यामुळे देहूमध्ये भक्तीचा महापूर लोटला आहे. अशातच मोठी वारी संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.

छत्रीवर हस्तकला पाहायला मिळत आहे. यंदाच्या छत्रीसाठी वेलवेट कापड वापरण्यात आले आहे. त्यावरील अब्दागिरी, गरूड टक्के, रेशमी ध्वज पताका, इत्यादी विविध नक्षीकाम भाविकांचं लक्ष वेधून घेईल. तसंच छत्रीवर शंख, चक्र, तिलक (गंध), गरूड, हनुमान यांची चित्रही विणून घेतली आहेत. तसेच, छत्रीमधील काड्या या नैसर्गिक बांबूच्या चिमट्यांपासून बनवलेल्या आहेत. लोखंडी तारांचा वापर केलेला नाही. तसंच छत्री पकडण्यासाठी 8 फूट उंचीचा एसएस लोखंडी भक्कम पाइप वापरला आहे. छत्रीवर पितळी कळस बसवण्यात आला असून ही संपूर्ण छत्री अतिशय आकर्षक आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
smoke
25.1 ° C
25.1 °
25.1 °
36 %
2.1kmh
0 %
Fri
27 °
Sat
28 °
Sun
29 °
Mon
29 °
Tue
28 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!