16.1 C
New Delhi
Saturday, November 23, 2024
Homeमहाराष्ट्रतुम्ही पर्यावरणाला वाचवा ,पर्यावरण तुम्हाला वाचवेल : डॉ. भारती चव्हाण

तुम्ही पर्यावरणाला वाचवा ,पर्यावरण तुम्हाला वाचवेल : डॉ. भारती चव्हाण

पिंपरी- आपल्या कुटुंबासाठी आपल्या वेळातील काही वेळ पर्यावरणासाठी प्रत्येकाने दिला पाहिजे. दिवसेंदिवस निसर्गाचा समतोल ढासळ चालला असल्याने प्रत्येकाने झाडे लावून जगवली पाहिजेत आणि देशी झाडे लावली पाहिजेत, असे मत कामगार कल्याण मंडळाच्या अध्यक्षा डॉ भारती चव्हाण यांनी व्यक्त केले.
गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या वतीने पिंपळे गुरव येथील 8 टू 80 उद्यानाच्या बाजूला वृक्षमित्र अरुण पवार व डॉ. भारती चव्हाण यांनी वृक्ष पालखीचे पूजन केले. वायु प्रदूषण, ध्वनी प्रदूषण कमी करण्याचे आवाहन वृक्षमित्र अरुण पवार यांनी केले. त्यांनी 500 झाडे वृक्षरोपणासाठी मोफत दिली. मंडळाने केलेल्या उपक्रमाची माहिती शहराध्यक्ष शरीफ महमंदशरीफ मुलानी यांनी दिली.


वृक्षदिंडीमध्ये मंडळाचे कोअर कमिटी सदस्य आण्णा जोगदंड यांनी आपल्या शर्टवर पर्यावरण जनजागृतीचा संदेश लिहीलेला शर्ट घालून, कावळा म्हणतो काव,काव ,एकतरी झाड लाव, असे म्हणत परीसर दणाणून सोडला.
तुकाराम महाराजांच्या भुमिकेत ह.भ.प. रामदास साबळे होते, तर किरण कांबळे यांनी डोक्यावर झाड, तोंडाला ऑक्सीजनचा मास्क लावून पर्यावरणाचा संदेश दिला.
वृक्षवल्ली आम्हां,सोयरे ,वनचरे असे भजन म्हणत पर्यावरणाचे स्लोगन हातात घेऊन वृक्षदिंडी काढली. वृक्षप्रेमींनी वृक्षदिंडीत फुगड्या खेळण्याचा आनंद घेतला.
वृक्ष लागवड करून पर्यावरणाशी आदराने वागण्याचा सल्ला वृक्षमित्र अरूण पवार यांनी दिला.
ते म्हणाले कि, आपल्या कुटुंबाप्रमाणे निसर्गावर प्रेम करा, तुकाराम महाराजांनी म्हटल्या प्रमाणे “वृक्षवल्ली आम्हां,सोयरे ,वनचरे”या अभंगाप्रमाणे निसर्गाशी आदराने वागा, सर्वांनी वर्षभर, वृक्ष लागवड व संगोपन आपापल्या परीने चालू ठेवा, आजचे पर्यावरणाचे रक्षण म्हणजे उद्याच्या तरुण पिढीच्या ऑक्सिजनची सोय आहे, असे प्रतिपादन वृक्षमित्र अरुण पवार यांनी केले.वृक्ष लागवडीमध्ये मराठवाडा जनविकास संघ, एन्व्हायरमेंट कंजर्वेशन असोसिएशन, तसेच तिरंगा क्रीडा मित्र मंडळ यांनी सहभाग नोंदवला.


यावेळी कोअर कमिटी सदस्य तानाजी एकोंडे,सचिव राजेश हजारे,भरत शिंदे, गोरखनाथ वाघमारे, गुणवंत कामगार काळूराम लांडगे ,संगीता जोगदंड ,लक्ष्मण इंगोले,अशोक सरतापे,संदीप पोलकम ,शिवाजी पाटील, अण्णा गुरव, भजनी मंडळाचे किरण कांबळे निनाभाऊ दुधाळ, कृष्णा परीट, रमेश बंड, गुरुदत्त भजनी मंडळ राजू उभे, विलास चोपडे, ह भ प शामराव गायकवाड ,ह भ प राऊत महाराज, ह भ प कुदळे महाराज, मुलानी सिराजभाई, बळीराम कातंगळे,नंदकुमार धुमाळ ,अमोल लोंढे ,दत्तात्रय धोंडगे, सूर्यकांत कुरुलकर किशोर अटरगेकर, संदीप पाटील, संतोष नलावडे, सामाजिक कार्यकर्त्या अनिता पांचाळ ,सुरेश कंक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन गुणवंत कामगार बाळासाहेब साळूके, महमशरीफ मुलानी,आण्णा जोगदंड, महेंद्र गायकवाड यांनी केले. तर आभार श्रीकांत कदम यांनी मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
16.1 ° C
16.1 °
16.1 °
77 %
0kmh
0 %
Fri
21 °
Sat
27 °
Sun
29 °
Mon
29 °
Tue
28 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!