28.4 C
New Delhi
Wednesday, July 2, 2025
Homeमहाराष्ट्रथोरले बाजीराव पेशवे जयंती निमित्त भव्य दुचाकी रॅली

थोरले बाजीराव पेशवे जयंती निमित्त भव्य दुचाकी रॅली

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, पुणे जिल्हा

पुणे_

एखादी गोष्ट जर जिद्दीने ठरवली तर टीम वर्क ने कशी साध्य होते याचे उदाहरण म्हणजे आजची, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पुणे जिल्ह्याने, थोरले बाजीराव पेशवे यांच्या 324व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेली यशस्वी दुचाकी रॅली !!

बालगंधर्व येथील झाशीच्या राणीच्या पुतळ्याला अभिवादन करुन सकाळी 9 वाजता जयघोषात निघालेल्या रॅली ने केसरी वाडा येथे लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला अभिवादन केले व शनिवार वाडा येथे थोरले बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याला नमन करुन रॅली ची समाप्ती झाली.

पुणे शहर व्यतिरिक्त वाघोली, हडपसर, शिक्रापूर, बालेवाडी, नसरापूर या भागातून अनेक पेशवे प्रेमी मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित राहिले.अर्धा जंगली महाराज मार्ग रॅली ने व्यापला.
150 पेक्षा जास्त गाड्या, शिस्तबद्ध रॅली, समाजपयोगी घोषणा, सर्व भगवेमय वातावरण, पारंपरिक पेहरावाद्वारे सर्वांचा उत्स्फूर्त सहभाग यांनी रॅली अतिशय यशस्वी पार पडली.
थोरले बाजीराव यांच्या उत्कृष्ठ पेहराव परिधान केलेल्या नील धडफळे ने खास रॅली साठी मागवलेल्या रोल्स राईस गाडीतून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

संपुर्ण शनिवार वाडा परिसर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या या उपक्रमाने व्यापून टाकला होता.
या रॅली च्या निमित्ताने अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या, पुणे जिल्ह्याच्या वतीने दोन प्रमुख मागण्या सरकारपुढे मांडल्या.
▪️शनिवारवाडा प्रांगणात भव्य अशी पेशवे सृष्टी निर्माण व्हावी
▪️पुणे एअरपोर्ट ला थोरले बाजीराव पेशवे एअरपोर्ट असे नामकरण करण्यात यावे.
याबाबत चा राज्यसरकार शी पत्रव्यवहार सुरू आहॆ अशी माहिती पुणे जिल्हाध्यक्ष मंदार रेडे यांनी दिली.

आजच्या या कार्यक्रमाला शनिवाड्यावर राज्यसभा खासदार मेधाताई कुलकर्णी, पेशव्यांचे वंशज पुष्कर पेशवा, हिंदुत्ववादी मिलिंद एकबोटे,टिळक प्रतिष्ठान चे शैलेश टिळक, कुणाल टिळक, रोहित टिळक, पेशवे प्रतिष्ठान चे कुंदनकुमार साठे आवर्जून उपस्थित होते.
नामदार चंद्रकांत दादा पाटील व राष्ट्रीय अध्यक्ष डॉ गोविंद कुलकर्णी, कार्याध्यक्ष निखिल लातूरकर यांनी फोन वरून रॅली ला शुभेच्छा दिल्या.

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने केतकी कुलकर्णी, दिलीप सातभाई, विजय शेकदार, धनश्री धडफळे, प्रसाद गिजरे, किशोर सरपोतदार, सुनील शिरगांवकर, वंदना धर्माधिकारी, नितीन फडणीस, राहुल जोशी, अमोघ पाठक, पल्लवी गाडगीळ, राहुल करमरकर, विकास कुलकर्णी, अवधूत देशमुख, मुग्धा अनगळ,विवेक खिरवडकर, रेणुका व गौरव गोखले, दत्तात्रय देशपांडे, मयुरेश चंद्रचूड, रोहिणी व श्रीकांत ढोले,श्री व सौ श्रीकांत क्षीरसागर, किरण काळे, राजेंद्र कुलकर्णी, योगेश कुलकर्णी, नीरज कुलकर्णी, जयश्री घाटे, लता बुरसे, रंगोली देशमुख, गायत्री मढीकर, अश्विनी व सुनील औरसंग, योगेश व प्रीती अनगळ, अभिनव पाठक,माधव कुलकर्णी, सचिन कुलकर्णी, सुभाष वानकर, अभय जोगळेकर,ऋषिकेश गोरे, गिरीश ओक व टीम, प्रसाद जोशी, जयदीप पटवर्धन, मिलिंद जोशी,निलेश क्षीरसागर, उमाकांत कुलकर्णी इ. महासंघाचे पदाधिकारी व इतर पेशवे प्रेमी रॅली मध्ये सहभागी होते. या यशस्वी रॅली चे आयोजन पुणे जिल्हाध्यक्ष मंदार रेडे यांनी केले होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
few clouds
28.4 ° C
28.4 °
28.4 °
77 %
2.7kmh
21 %
Wed
38 °
Thu
40 °
Fri
38 °
Sat
36 °
Sun
35 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!