29.2 C
New Delhi
Wednesday, August 20, 2025
Homeमहाराष्ट्र‘द गोल्ड रश’ला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद!

‘द गोल्ड रश’ला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद!

जगविख्यात चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक चार्ली चॅप्लिन यांच्या ‘द गोल्ड रश’ या चित्रपटाच्या शताब्दीनिमित्त दाखवण्यात आलेल्या या चित्रपटास पुणे आणि लातूर येथे प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. पुणे फिल्म फाऊंडेशन आणि पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ) यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच याचे आयोजन करण्यात आले. पुण्यात ई-स्क्वेअर मल्टिप्लेक्स व राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय) तसेच लातूरमधील पीव्हीआर येथे या चित्रपटाचे शो झाले. पुण्यातील प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादामुळे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात लगेचच दुसरा शो आयोजित करण्यात आला. १९२५ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ४के रिस्टोर्ड व्हर्जन मध्ये सादर करण्यात आला. विनोदी शैलीतून सामाजिक संदेश देणारा आणि चार्ली चॅप्लिन यांचा मास्टरपीस ठरलेला हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्याचा अनुभव प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय ठरला.

पुण्यातील ई-स्क्वेअर मल्टिप्लेक्समध्ये झालेल्या निमंत्रितांच्या शोमध्ये अमोल पालेकर, डॉ. जब्बार पटेल, सतीश आळेकर, समर नखाते, उमेश कुलकर्णी, निखिल महाजन, अश्विनी गिरी, सविता व रणजीत नाईकनवरे, सुनील सुकथनकर, जसबीर सिंह, विद्याधर वाटवे आदी मान्यवर आवर्जून सहभागी झाले होते.

या प्रसंगी ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी सांगितले, “मी लहान, सुमारे १२ वर्षांचा असताना ‘द गोल्ड रश’ हा चार्ली चॅप्लिन यांचा चित्रपट पाहिला होता आणि मला तो त्या वयातही आवडला होता. आता इतक्या वर्षांनी हा चित्रपट बघताना पुन्हा तेवढाच आनंद झाला आहे. त्यांचे चित्रपट जणू खजिनाच असतात.”

दिग्दर्शक सुनील सुकथनकर म्हणाले, “माझ्या घरात एखादे पोस्टर लावायचे असेल तर ते निश्चित चार्ली चॅप्लिन यांचेच असेल. चार्ली चॅप्लिन हे खऱ्या अर्थाने जादू होते.”

तर दिग्दर्शक वरुण नार्वेकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले, “जुन्या काळातील कृष्णधवल चित्रपट म्हणजे हिऱ्याप्रमाणे अमूल्य ठेवा असून ‘द गोल्ड रश’सारखे चित्रपट आपण वारंवार बघितलेच पाहिजेत.”

प्रेक्षकांसाठी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय) येथे शो आयोजित करण्यात आला. प्रेक्षकांचा प्रतिसाद इतका उत्स्फूर्त होता की सभागृह क्षणात भरून गेले आणि लगेचच त्याच ठिकाणी आणखी एक शो दाखवावा लागला.

अभिजात फिल्म सोसायटीच्या सहाय्याने लातूर येथील पीव्हीआरमध्ये झालेल्या ‘द गोल्ड रश’च्या शोनेही उत्साहाचे वातावरण निर्माण केले. सभागृह पूर्ण भरले होते आणि प्रेक्षकांनी तुफान आनंद लुटला. ही घटना लातूरच्या सांस्कृतिक इतिहासात अभिमानाची नोंद ठरली.

अभिजात फिल्म सोसायटीचे मधुसूदन (आदित्य) कुलकर्णी यांनी सांगितले, “चित्रपट पाहणे ही केवळ करमणूक नसून एक कला आहे, याचा प्रत्यय यानिमित्ताने आला. द गोल्ड रशने पुन्हा एकदा आम्हाला चार्ली चॅप्लिनचे चाहते केले.”
पुणे फिल्म फाऊंडेशन आणि पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (पिफ) या उपक्रमामुळे पुणे आणि लातूर या ठिकाणी आंतरराष्ट्रीय चित्रपटप्रेमींना जागतिक दर्जाचा सिनेमा अनुभवता आला. मुंबई आणि नागपूर येथे लवकरच या सिनेमाचा शो होणार असल्याची माहिती, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उपसंचालक विशाल शिंदे यांनी दिली.

विशाल शिंदे – 9011133111
प्रवीण प्र. वाळिंबे
माध्यम समन्वयक
९८२२४५४२३४ / ७३८७००२०९७

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
29.2 ° C
29.2 °
29.2 °
50 %
4.7kmh
94 %
Wed
34 °
Thu
36 °
Fri
35 °
Sat
32 °
Sun
32 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!