31.3 C
New Delhi
Sunday, April 20, 2025
Homeमहाराष्ट्रपिंपरी-चिंचवडमध्ये हनुमान जयंतीनिमित्त ११११ भक्तांचे सामूहिक पठण आणि पारंपरिक जोर-बैठक स्पर्धा

पिंपरी-चिंचवडमध्ये हनुमान जयंतीनिमित्त ११११ भक्तांचे सामूहिक पठण आणि पारंपरिक जोर-बैठक स्पर्धा

पिंपरी-चिंचवड, – आमदार आणि भाजप शहराध्यक्ष शंकरभाऊ जगताप यांच्या संकल्पनेतून पिंपरी-चिंचवड शहरात यंदा श्री हनुमान जयंती विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरी होणार आहे. या विशेष कार्यक्रमांतर्गत शनिवारी, १२ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ८ वाजता काळेवाडी येथील आरंभ बँक्वेट हॉल येथे १,१११ भक्तांच्या उपस्थितीत श्री हनुमान चालीसाचे सामूहिक पठण होणार आहे.

या भक्तिमय कार्यक्रमासोबतच शहरात प्रथमच पारंपरिक भारतीय जोर-बैठक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय संस्कृतीचे जतन आणि प्रचार-प्रसार करण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

स्पर्धेचे वयोगट आणि पारितोषिके पुढीलप्रमाणे:

वयोगट १० ते १५ वर्षे:

  • प्रथम पारितोषिक – ₹५००१ आणि प्रशस्तीपत्रक
  • द्वितीय – ₹४००१ आणि प्रशस्तीपत्रक
  • तृतीय – ₹३००१ आणि प्रशस्तीपत्रक

वयोगट १५ ते २० वर्षे:

  • प्रथम – ₹६००१ आणि प्रशस्तीपत्रक
  • द्वितीय – ₹५००१ आणि प्रशस्तीपत्रक
  • तृतीय – ₹४००१ आणि प्रशस्तीपत्रक

वयोगट २० ते २५ वर्षे:

  • प्रथम – ₹७००१ आणि प्रशस्तीपत्रक
  • द्वितीय – ₹६००१ आणि प्रशस्तीपत्रक
  • तृतीय – ₹५००१ आणि प्रशस्तीपत्रक

स्पर्धेसाठी नियम व अटी:

  1. नावनोंदणी आवश्यक आहे (ऑनलाइन किंवा ऑफलाइन)
  2. स्पर्धेचे नियम आयोजक ठरवतील
  3. दिलेल्या वेळेत जास्तीत जास्त जोर-बैठका करणाऱ्या स्पर्धकास पारितोषिक

नावनोंदणीची अंतिम मुदत: ११ एप्रिल २०२५ रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आहे.

नावनोंदणीसाठी संपर्क:

  • जोर-बैठक स्पर्धा: काळूराम नढे – 9922908522
  • हनुमान चालीसा पठण: आकाश भारती – 9545142477

या कार्यक्रमाच्या निमित्ताने शहरात भक्तिभावासोबत आरोग्य आणि परंपरेचा संगम घडणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
few clouds
31.3 ° C
31.3 °
31.3 °
41 %
6kmh
16 %
Sun
41 °
Mon
41 °
Tue
41 °
Wed
42 °
Thu
40 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!