पुणे-शहरात यंदा एप्रिलमध्ये गेल्या २४ वर्षांमधील सर्वाधिक कडक उन्हाळा ठरला. त्यानंतर मेमध्ये सुरुवातीचे नऊ दिवस उन्हाचा चटका कायम होता. कमाल तापमानाचा पारा सातत्याने सरासरीपेक्षा जास्त नोंदला जात होता. शहरात सलग तिसऱ्या दिवशी शनिवारी वळिवाच्या पावसाच्या दमदार सरी बरसल्या. त्यामुळे गेल्या दशकात मे मध्ये पडलेला हा सर्वाधिक पाऊस ठरला आहे. यापूर्वी २०१५ मध्ये (१४ मे) एका दिवसात १०२ मिलिमीटर पाऊस कोसळला होता.त्यानंतर शनिवारी सायंकाळी साडेआठपर्यंत शहरात ४०.४ मिलिमीटर पाऊस पडला.शुक्रवारी सकाळी साडेआठ ते शनिवारी सकाळी साडेआठ या २४ तासांमध्ये शिवाजीनगर येथे २८.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. शनिवारी सायंकाळी ४०.४ मिलिमीटर पावसाची नोंद शिवाजीनगर येथील वेधशाळेत झाली. हा गेल्या दशकातील सर्वाधिक पाऊस ठरला. शनिवारी शिवाजीनगर येथील वेधशाळेत कमाल तापमानाचा पारा ३७.८ अंश सेल्सिअस नोंदला गेला. लोहगाव येथे ३९.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
पुणेकर झाले गारेगार
पुण्यात पडला सर्वाधिक वळव्याचा पाऊस
RELATED ARTICLES
New Delhi
overcast clouds
26
°
C
26
°
26
°
93 %
3.9kmh
100 %
Mon
31
°
Tue
34
°
Wed
36
°
Thu
33
°
Fri
32
°