13.1 C
New Delhi
Thursday, November 27, 2025
Homeमहाराष्ट्रपुणे मेट्रो तर्फे 'नॉन केवायसी कार्ड' (हस्थांतराणिय) लाँच

पुणे मेट्रो तर्फे ‘नॉन केवायसी कार्ड’ (हस्थांतराणिय) लाँच

पुणे मेट्रोने प्रवाश्यांच्या सुविधेसाठी ‘एक पुणे कार्ड’ आणि विद्यार्थ्यांसाठी ‘विद्यार्थी पास कार्ड’ या दोन कार्डांच्या मार्फत सेवा सुरु केलीआहे. आजतागायत ४६,६५९ एक पुणे कार्ड आणि १५,८६५ विद्यार्थी पास कार्ड प्रवाश्यानी खरेदी केली आहेत. आज दिनांक ७/१०/२०२४ रोजी पुणे मेट्रोने नॉन केवायसी ‘एक पुणे ट्रान्सीट कार्ड’ लाँच केले आहे.
पुणे मेट्रोच्या ‘एक पुणे कार्ड’ आणि ‘विद्यार्थी पास कार्ड’ यापैकी कोणतेही कार्ड खरेदी करण्यासाठी नागरिकांना केवायसी करणे अनिवार्य होते. पण एक पुणे ट्रान्सीट कार्ड खरेदी करण्यासाठी नागरिकांना केवायसी करण्याची गरज नाही. हे कार्ड खरेदी करण्यासाठी कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता पडणार नाही. तसेच हे कार्ड फक्त प्रवासासाठी असून याचा उपयोग एक पुणे कार्ड प्रमाणे प्रवासाव्यतिरिक्त इतरत्र करता येणार नाही. एक पुणे ट्रान्सीट कार्डची वैधता ५ वर्ष किंवा कार्ड वर नमूद केल्याप्रमाणे असेल. हे कार्ड खरेदी करण्यासाठी १०० रुपये + १८ % जीएसटी (११८ रुपये) आकार पडेल. या कार्ड मध्ये एकावेळेस ३००० रुपये पर्यंत अधिकतम रक्कम टॉप अप करता येऊ शकते. या कार्डचे टॉप अप आपण पूर्वी प्रमाणे पुणे मेट्रो अँपद्वारे अथवा मेट्रो स्थानकांवर जाऊन ग्राहक सेवा केंद्रातून करू शकता. एक पुणे ट्रान्सीट कार्ड टॉप अप सुविधेसाठी ‘एक पुणे कार्ड’ प्रमाणेच शुल्क असणार आहे.
‘एक पुणे ट्रान्सीट कार्ड’ वर प्रवाश्यांना ‘एक पुणे कार्ड’ प्रमाणेच सवलत सुविधा लागू असतील (सोमवार ते शुक्रवार १० % सवलत आणि शनिवार व रविवार ३० % सवलत). एक पुणे ट्रान्सीट कार्ड हे हस्थांतराणिय व विनापरतावा कार्ड असणार आहे. देशातील NCMC प्रणालीवर चालणाऱ्या सर्व वाहतूक सेवांसाठी हे कार्ड फक्त प्रवासासाठी वापरण्यात येऊ शकते. एखादी कंपनी आपल्या १० सेल्समन साठी १ कार्ड घेऊ शकते व ज्या सेल्समनला गरज असेल तो सेल्समन त्या दिवशी ते कार्ड वापरेल. दुसऱ्या दिवशी दुसरा सेल्समन ते कार्ड वापरू शकेल. तसेच बऱ्याच कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना फूड कुपन देतात, त्याचप्रमाणे हे कार्ड टॉपअप करून भेट म्हणून देऊ शकते. 100 पेक्षा जास्त कार्ड घेणाऱ्या कंपनीचे नाव कार्डवर छापता येईल. या प्रसंगी महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी म्हटले आहे की, “देशात प्रथमच नॉन केवायसी हस्तांतरणीय ट्रॅव्हल कार्ड महा मेट्रो वापरात आणत आहे, ही नक्कीच पुणेकरांसाठी एक अभिमानास्पद बाब आहे. पुणे मेट्रोमध्ये ७५ % पेक्षा जास्त डिजिटल पेमेंट द्वारे तिकीट खरेदी होत आहे. ही देखील भारतात सर्वात जास्त टक्केवारी आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
13.1 ° C
13.1 °
13.1 °
76 %
0kmh
0 %
Wed
19 °
Thu
25 °
Fri
26 °
Sat
26 °
Sun
25 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!