23.1 C
New Delhi
Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्रबहुचर्चित भारतातील सर्वात पहिल्या प्रभू श्रीरामांच्या पूर्णाकृती शिल्पाचे मुख्यमंत्र्याचा हस्ते होणार उद्घाटन..!!

बहुचर्चित भारतातील सर्वात पहिल्या प्रभू श्रीरामांच्या पूर्णाकृती शिल्पाचे मुख्यमंत्र्याचा हस्ते होणार उद्घाटन..!!

(पुणे) पुणे शहरातील हडपसर येथील भारतातील सर्वात पहिल्या प्रभू श्रीरामांच्या पुर्णाकृती शिल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते येत्या शनिवारी (१७ऑगस्ट) होणार आहे.
हडपसरमधील श्रीराम चौक,हांडेवाडी रोड येथे,
सायंकाळी सहा वाजता हा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
प्रभू श्रीराम यांचे सार्वजनिक ठिकाणी उभारलेले हे भारतातील पहिलेच पुर्णाकृती शिल्प आहे. या उद्घाटन सोहळ्याला शिवसेनेतील अनेक मातब्बर नेते उपस्थित राहणार आहेत‌.सन २०१८पासून विविध शासकीय विभागाच्या परवानग्या घेत श्रीरामभक्त शिवसेना शहरप्रमुख प्रमोनाना भानगिरे यांनी स्वखर्चातून गेल्या वर्षभरापासून शिल्पाची उभारणी सुरु केली होती.जनभावना आणि स्वत:ची श्रीरामभक्ती लक्षात घेत प्रभू श्रीराम यांच्या पूर्णाकृती शिल्पनिर्मितीचा निर्णय घेतला. सार्वजनिक ठिकाणी उभारल्या जाणाऱ्या या शिल्पासाठी 2018 सालापासून नगर विकास विभाग, गृह विभाग व इतर अनेक परवानग्या पूर्ण करीत या शिल्पाला मान्यता देण्यात आली. या शिल्पामुळे परिसरातील राम भक्तांना पुणे शहरातील तमाम हिंदू बांधवांना प्रभू श्रीरामाचे दर्शन करता यावे ही एकमेव सदिच्छा या शिल्प उभारणीमागे असल्याचे प्रमोद नाना भानगिरे यांनी सांगितले.


महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते होणाऱ्या या सोहळ्याला, राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात पाटील, केंद्रीय सहकार आणि नागरी वाहतूक खात्याचे राज्यमंत्री ,पुण्याचे खासदार मुरलीधर मोहळ,शिवसेना नेत्या,विधानपरीषदेच्या उपसभापती डॉ.नीलमताई गोऱ्हे, खासदार श्रीकांत शिंदे,प्रदेश समन्वयक खासदार नरेश म्हस्के,शिवसेनेचे विधानसभेचे मुख्य प्रतोद भरतशेठ गोगावले,
माजी मंत्री विजय शिवतारे, पुणे म्हाडा अध्यक्ष तथा मा.खासदार शिवाजीराव आढळराव पाटील
हडपसरचे आमदार चेतन तूपे, विधानपरिषद सदस्य योगेश टिळेकर, उद्योजक पुनित बालन ,पुणे मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले ,पोलिस आयुक्त पुणे अमितेश कुमार आदिंसह, हिंदू धर्माभिमानी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
आपल्या सर्वांच्या आराध्य दैवत, मर्यादा पुरषोत्तम प्रभु श्रीरामांच्या भारतातील पहिल्या सार्वजनिक शिल्पाच्या उद्घाटनाच्या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन श्रीरामभक्त प्रमोदनाना भानगिरे यांच्याकडून करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
smoke
23.1 ° C
23.1 °
23.1 °
43 %
2.1kmh
0 %
Fri
27 °
Sat
28 °
Sun
29 °
Mon
29 °
Tue
28 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!