बेवारस मृतांच्या अस्थींचे विधिवत विसर्जन
राष्ट्रीय कलाकादमी तर्फे आयोजन
पुणे : हिंदू परंपरेनुसार मृत्यूनंतर अस्थी विसर्जन ही आत्म्याच्या शांतीची शेवटची पायरी मानली जाते. परंतु अनेकदा अपघात अथवा इतर कारणांनी रस्त्यावर मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या देहाची ओळख पटत नाही. अशा मृतदेहांना कुणीही वारस नसल्याने ते बेवारस अवस्थेतच राहतात. अशा बेवारस आत्म्यांना सन्मानाने निरोप मिळावा, या हेतूने राष्ट्रीय कला अकादमीतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्वपित्री अमावास्येनिमित्त बेवारस अस्थींचे विधिवत विसर्जन करण्यात आले. गीतेच्या पंधराव्या अध्यायाचे पठण, मंत्रोच्चारात अस्थी विसर्जन विधी पार पडला.
आरटीओ जवळील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर संगम घाटावर विधिवत पूजन करून अस्थींचे विसर्जन करण्यात आले. या उपक्रमासाठी पुणे महानगरपालिका ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाचे विशेष सहकार्य मिळाले. यावेळी नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पराग ठाकूर, डॉ. मिलिंद भोई, विनायक घाटे, राजेंद्र बलकवडे, शिरीष मोहिते, नितीन पंडित, पियुष शहा, आशिष जराड, राजाभाऊ कदम, दिलीप काळोखे, लता राजगुरू, पुणे महानगरपालिका परिमंडळ एक उपायुक्त माधव जगताप, ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक आयुक्त भास्कर महाडिक, आरोग्य निरीक्षक विक्रम सरवदे, मुकादम नागेश बाराथे, नागेश लांडगे आणि सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. सदाशिव कुंदेन यांनी अस्थींचे पूजन केले.
कार्यक्रमाचे संयोजन अकादमीचे मंदार रांजेकर, रोमा लांडे, अमर लांडे, सदाशिव कुंदेन, अतुल सोनवणे, सुनील सोनटक्के, सचिन देसाई, बाला शुक्ला, किरण फाळके, राजेश निकम, सुप्रिया दळवी, प्रिया भोंडवे, मनोज गवळी यांनी केले.
माधुरी मिसाळ म्हणाल्या, सर्वपित्री अमावस्येला आपल्या पूर्वजांना आपण स्मरतो, पण बेवारस आत्म्यांनाही शांती लाभावी ही भावना मनात ठेवून राबविलेला हा उपक्रम म्हणजे खरी माणुसकी आहे. धर्म-जात न पाहता अस्थींचे विधिवत पूजन आणि विसर्जन करणे या माध्यमातून एकतेचा संदेश राष्ट्रीय कला अकादमीच्या माध्यमातून समाजात जात आहे.
राष्ट्रीय कला अकादमीचे अध्यक्ष मंदार रांजेकर म्हणाले, बेवारस मृतांना कोणी नसते, त्यामुळे त्यांचे शेवटचे संस्कार होणे कठीण होते. गेली १५ वर्षे आम्ही हा उपक्रम राबवतो आहोत. कोणताही धार्मिक अडसर न ठेवता केवळ माणुसकीच्या भावनेतून हा उपक्रम अकादमीच्या वतीने केला जातो.