गंगाजल मध्ये गणपती विसर्जन करण्याच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे : कर्मयोग प्रतिष्ठाण संलग्न सौ. श्रध्दाताई गोरक्ष उर्फ आप्पा परांडे जनहित मंच यांच्या वतीने गणपती विसर्जन करण्यासाठी त्रिवेणी संगम, प्रयागराज येथून आणलेल्या पवित्र जलाचे गंगा पूजन आणि आरती समारंभ आज श्री जानुबाई देवी हॉल,धनकवडी,पुणे येथे संपन्न झाले. गणपती विसर्जनसाठी गंगाजल वापरणार हा महाराष्ट्रातील एकमेव उपक्रम आहे.
या प्रसंगी आमदार भीमराव अण्णा तापकीर,आमदार विजय बाप्पू शिवतारे,राष्ट्रसंत भाऊ महाराज परांडे,योगगुरू दिपक शिळीमकर,वैशाली शिळीमकर,तात्यासाहेब भिंताडे,सौ. श्रध्दाताई गोरक्ष आप्पा परांडे,मोनल दुगड,गौरव दुगड,अध्यक्ष गोरक्ष आप्पा परांडे,हनुमंत परांडे
आदि मान्यवर उपस्थित होते.
या अनोख्या उपक्रमाबद्दल बोलताना कर्मयोग प्रतिष्ठाण संलग्न सौ. श्रध्दाताई गोरक्ष आप्पा परांडे जनहित मंचचे अध्यक्ष गोरक्ष आप्पा परांडे म्हणाले, मागील पाच वर्षांपासून आम्ही हा उपक्रम राबावत आहोत, त्याला या परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, मागील वर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि घरगुती अशा एकूण 6 हजार 800 हून अधिक गणेश मूर्ती या ठिकाणी विसर्जित करण्यात आल्या होत्या. यंदाच्या उपक्रमाचे वैशिष्ट्ये म्हणजे आम्ही दरवर्षी काशी, वाराणसी येथून गंगाजल आणत होतो यंदा कुंभमेळा होता यामुळे आम्ही प्रयागराज येथून टँकर आणले आहेत. आणि काशी येथे जे पुरोहित गंगा आरती करतात त्यातील 11 पुरोहितांच्या हस्ते आज ही आरती पुण्यात संपन्न झाली. सर्व भक्तांचे विघ्न दूर करणाऱ्या बाप्पाचे विसर्जन हे शुद्ध, पवित्र पाण्यात व्हावे ही आमची या उपक्रमामागील भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले.
आमदार विजय शिवतारे म्हणाले, गंगाजल मध्ये गणेश विसर्जन ही संकल्पना परांडे मागील काही वर्षांपासून राबवत आहेत. आज गंगाजल पूजन झाले, या अर्ध्या तासाच्या कार्यक्रमाने आपला सनातन धर्म कसा आहे हे वास्तव समाजासमोर आले, मनाला प्रसन्न करणारा हा प्रसंग होता.