25.1 C
New Delhi
Thursday, November 21, 2024
Homeमहाराष्ट्रभारत माताच संपूर्ण जगाला सुख व शांतीचा मार्ग दाखविणार-डॉ. विश्वनाथ दा. कराड

भारत माताच संपूर्ण जगाला सुख व शांतीचा मार्ग दाखविणार-डॉ. विश्वनाथ दा. कराड

तामिळनाडू येथील कुमारागुरू फाउंडेशन डे निमित्त निर्मित ग्रंथाचे प्रकाशन


पुणे, : “स्वामी विवेकानंद यांनी सांगितल्यानुसार भारत माताच संपूर्ण जगाला सुख, समाधान आणि शांतीचा मार्ग दाखविणार आहे. विज्ञान आणि आध्यात्माची सांगड घालून एमआयटी संस्थेत विद्यार्थ्यांना मूल्याधिष्ठित शिक्षण देण्याचे कार्य सुरू आहे. तसेच येथे विद्यार्थ्यांच्या चारित्र्य निर्मितीवर अधिक भर दिला जातो.” असे विचार एमआयटी डब्ल्यूपीयूचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी व्यक्त केले.तामिळनाडूच्या कोयंबटूर मधील कुमारागुरू संस्थेच्या वतीने कुमारागुरू फाउंडेशन डे आणि अरूचेलवर यांच्या जन्म शताब्दी निमित्त कुमारागुरू संस्थेच्या वतिने तयार करण्यात आलेल्या ग्रंथाचे प्रकाशन गुरूवारी एमआयटी डब्ल्यूपीयूत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
या प्रसंगी शक्ती ग्रुप ऑफ कंपनीजचे वरिष्ठ उपाध्यक्ष पेरूमल, राष्ट्रसंचार व पंढरी संचार वृत्तपत्राचे संचालक संपादक बाळासाहेब बडवे, डॉ. संजय उपाध्ये, गिरीश दाते व राजेंद्र रणभोर उपस्थित होते.
तामिळनाडूच्या कोयंबटूर मधील कुमारागुरू संस्थेच्या वतिने कुमारागुरू फाउंडेशन डे आणि अरूचेलवर यांच्या जन्म शताब्दी निमित्त डॉ. विश्वनाथ दा कराड व सौ.उषा विश्वनाथ कराड यांचा ‘अरूचेलवर डॉ. एन. महालिंगम पुरस्कार’ देऊन नुकताच विशेष सत्कार करण्यात आला होता. या संपूर्ण कार्यक्रमाची आणि एमआयटी डब्ल्यूपीयू संदर्भातील सर्व कार्याचा आढावा या ग्रंथात नमुद करण्यात आला आहे.
प्रा.डॉ. विश्वनाथ दा.कराड म्हणाले,” संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरू संत तुकाराम यांच्या तत्वज्ञानाचे पालन एमआयटी शिक्षण संस्था विद्यार्थ्यांचे जीवन घडवित आहे. तसेच जगातील सर्वात मोठ्या डोमची निर्मिती करून संपूर्ण मानव जातीला शांतीचा संदेश देण्याचे कार्य सुरू आहे.”

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
25.1 ° C
25.1 °
25.1 °
33 %
2.6kmh
0 %
Thu
26 °
Fri
27 °
Sat
28 °
Sun
30 °
Mon
29 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!