मुंबई, — महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती तसेच ज्येष्ठ लेखिका डॉ. नीलम गोऱ्हे ‘मनमोकळे शब्दयात्री’ या दूरदर्शन सह्याद्रीवरील विशेष साहित्य प्रवासात प्रेक्षकांना भेटणार आहेत.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उन्नती बागुल-जगदाळे करणार असून, डॉ. गोऱ्हे यांच्या साहित्य प्रवासातील अनुभव, लेखनाची वाटचाल आणि समाजकारणाशी जोडलेला त्यांचा दृष्टिकोन यावर या वेळी मनमोकळ्या गप्पा रंगणार आहेत.
कार्यक्रमाचे प्रसारण बुधवार, दि. २० ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ८.३० वाजता होणार आहे. तर पुनःप्रसारण गुरुवार, दि. २१ ऑगस्ट रोजी दुपारी ३.३० वाजता तसेच रविवार, दि. २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.०० वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
साहित्य, समाज आणि संवेदनशील विचारांची ही अनोखी भेट प्रेक्षकांनी दूरदर्शन सह्याद्रीवर नक्की अनुभवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.