27.1 C
New Delhi
Friday, September 19, 2025
Homeमहाराष्ट्रमहागाईने त्रस्त जनता भाजपला घरचा रस्ता दाखवणार - रोहन सुरवसे पाटील

महागाईने त्रस्त जनता भाजपला घरचा रस्ता दाखवणार – रोहन सुरवसे पाटील

पुणे : महागाई, बेरोजगारी, असुरक्षितता तसेच अन्याय-अत्याचाराविरोधी लढा देण्यासाठी, एकी हेच बळ समजून काँग्रेस कार्यकर्त्यांनी निवडणुकीला सामोरे जाण्याचे ठरवले असून भाजप आणि महायुतीचा पराभव करण्यासाठी कंबर कसली आहे. शाळा-महाविद्यालयातील मुलींची तसेच राज्यात सर्वत्र महिला सुरक्षा महायुती सरकारच्या काळात रामभरोसे झाली आहे. लाडकी बहीण योजनेतून भीक नको, पण हाताला काम द्या, असा सूर आता सर्वसामान्य जनतेतून उमटू लागला आहे, अशी भावना युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रोहन सुरवसे-पाटील यांनी व्यक्त केली.

सुरवसे-पाटील म्हणाले की, लोकसभा निवडणुकीमध्ये जनतेने काँग्रेसला साथ दिली. आता विधानसभा निवडणुकीमध्ये देखील जनता महाविकास आघाडीच्या पाठीशी ठामपणे उभी आहे.भाजप सरकार जनतेला धार्मिक व जातीयवादी मुद्द्यांवर भरकटवण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, भूलथापांना आता महागाईने पिचलेली जनता भीक घालणार नाही. ईडी, सीडी, आयकर विभागाची भीती दाखवून, पक्ष फोडून सत्ता मिळवणाऱ्यांना आता जनता घरी बसवणार हे सांगण्यासाठी कोणा भविष्यवेत्त्याची गरज नाही. सर्वसामान्य जनतेनेच आता महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक हातात घेतली आहे.हरियाणातील विजय निश्चित झाला होता. एक्झिट पोलसह जनतेनेही ठणकावून सांगितले होते. मतमोजणीच्या पहिल्या-दुसऱ्या टप्प्यात ७५ काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर असताना पराभव कसा होऊ शकतो, असा सवाल जनता विचारू लागली आहे. आम्हाला आश्वासन नको, न्याय हवा आहे. सामान्य जनतेच्या विकासासाठी काम करणाऱ्या काँग्रेस सरकारची गरज आहे, हीच भावना जनमाणसामध्ये निर्माण झाली आहे.महागाईने कष्टकरी, कामगारांना दिवाळीचे दोन घाससुद्धा खाता येईना अशी परिस्थिती आज झाली आहे. लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये देऊन महागाई गगनाला भिडवणाऱ्या सरकारला नेस्तनाबूत करायची वेळ आली आहे. उठा उठा मतदान करा आणि भाजप सरकार हद्दपार करा अशी ठोस भूमिका जनतेने घेतल्याचे रोहन सुरवसे पाटील यांनी सांगितले.

महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे पक्षाने दिलेल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी चंग बांधला आहे. बंडखोरी करून सत्ताधाऱ्यांना मदत करण्यापेक्षा एकदिलाने काँग्रेस मजबुतीकरणासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे आणि जनहिताचे ठरणार आहे.

  • रोहन सुरवसे-पाटील,
    सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
27.1 ° C
27.1 °
27.1 °
89 %
1.5kmh
40 %
Fri
34 °
Sat
38 °
Sun
38 °
Mon
38 °
Tue
38 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!