पिंपरी,- ध्रुवीकरण करण्याच्या उद्देशाने देशभर जाती, धर्मा मध्ये मतभेद निर्माण करून समाजामध्ये फूट पाडण्याचे काम भाजपा करीत आहे. त्याला काँग्रेस धर्मनिरपेक्ष विचार पुढे नेत उत्तर देत आहे. मागील दहा वर्षात भाजपाने सर्वसामान्य साठी एकही योजना पूर्णत्वास नेली नाही, तर फक्त घोषणा देत मतदार राजाची दिशाभूल केली. मात्र काँग्रेसने पंचसूत्री कार्यक्रमा नुसार कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल प्रदेश मध्ये दिलेली आश्वासने पूर्ण केली आहेत. आता महाराष्ट्रात देखील महाविकास आघाडीचे सरकार यावे अशी मतदारांचीच इच्छा आहे असे प्रतिपादन
काँग्रेसच्या केंद्रीय कमिटीचे सदस्य व स्टार प्रचारक, कर्नाटकचे ऊर्जामंत्री के. जे. जॉर्ज यांनी काळेवाडी पिंपरी येथे सोमवारी संवाद सभेत केले.
महाविकास आघाडीच्या पिंपरी चिंचवड भोसरी विधानसभेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या संवाद सभेत के. जे. जॉर्ज बोलत होते. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव पृथ्वीराज साठे, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बाबू नायर, पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष कैलास कदम, लक्ष्मी नायर, पिंपरी चिंचवड दक्षिण भारतीय सेलचे अध्यक्ष जॉर्ज मॅथ्यू,सज्जी वर्की, अजि जॉन, रवी एन. पी., करीम, कामगार नेते राजन नायर, काँग्रेस प्रदेश सचिव मनोज कांबळे, काँग्रेस शहर वरिष्ठ उपाध्यक्ष मयूर जयस्वाल, काँग्रेस शहर युवा उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव, सह शहरातील दक्षिण भारतीय बंधू-भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक बाबू नायर यांचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. स्वागत जॉर्ज मॅथ्यू, सूत्रसंचालन एन. पी. रवी आणि आभार अजि जॉन यांनी मानले.
महाराष्ट्रात मविआचे सरकार यावे ही मतदारांचीच इच्छा – के. जे. जॉर्ज
RELATED ARTICLES
New Delhi
mist
10.1
°
C
10.1
°
10.1
°
87 %
1kmh
0 %
Thu
25
°
Fri
26
°
Sat
26
°
Sun
25
°
Mon
25
°


