पुणे- अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ हडपसर शाखेने, समाजबांधवांच्या प्रगतीसाठी, उन्नतीसाठी एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.महाराष्ट्र शासनाच्या अमृत महामंडळ या संस्थेच्या सवर्णांसाठी असलेल्या अनेक समाजपयोगी योजना या कार्यक्रमाच्या निमित्ताने लोकांपर्यंत पोहचवण्यात आल्या.अमृत महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री विजय जोशी यांनी शासनाच्या 14 विविध योजना ज्यामध्ये शैक्षणिक अनुदान, व्यावसायिक अनुदान, कृषी विषयक योजना, कर्ज परतावा योजना व त्याविषयी अर्ज प्रक्रिया लाभार्थ्यांना सांगितल्या.आजच्या या कार्यक्रमाला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला, अनेकांनी याबद्दल मनातील प्रश्न विचारून, लाभार्थी बनण्याची प्रक्रिया सुरू केली. हे या कार्यक्रमाचे यश म्हणता येईल.पुणे जिल्हा अध्यक्ष मंदार रेडे यांनी महासंघाच्या विविध अभियानाची व विस्ताराची माहिती सांगितली. जिल्हाध्यक्षा महिला आघाडी सौ केतकी कुलकर्णी यांनी उपस्थित महिलांना व्यवसाय वाढीचा व सक्षमीकरणाचा कानमंत्र दिला, सौ अमृता मेढेकर यांनी सूत्रसंचालन केले. अमोघ पाठक यांनी ब्रह्मद्योग आघाडीची माहिती दिली व आघाडीच्या कार्यकारिणी नियुक्त्या देण्यात आल्या. शाखा अध्यक्ष सौ अनिता काटे यांनी स्वागत केले.आजच्या या कार्यक्रमाला जिल्हा सरचिटणीस आकांक्षा देशपांडे,ऋचा पाठक,अश्विनी औरसंग, राजेंद्र कुलकर्णी, सुरेखा पारवेकर, दत्तात्रय देशपांडे, अभिजित देशपांडे, योगेश कुलकर्णी, श्रीकांत क्षीरसागर, किरण काळे,अशोक मेढेकर,प्रदीप कडू, स्मिता बुचके,ओंकार बुचके,स्नेहल पाठगांवकर, स्वाती घुमरे, सौरभ कुलकर्णी,सविता राजाज्ञ्,अभय जोशी, विवेक मोहरीर,आशिष फाटक, अक्षय जोशी, कराड वरून आलेले बापूसाहेब चिवटे आवर्जून उपस्थित होते.आपल्या समाजबांधवांच्या आर्थिक प्रगतीसाठी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने उचललेल्या या यशस्वी पाऊलाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहॆ.
महाराष्ट्र शासनाच्या अमृत महामंडळ योजनेचे दिले महत्व
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ हडपसरच्या शाखेचा अनोखा उपक्रम; लाभार्थी प्रक्रिया केली सुरु
RELATED ARTICLES
New Delhi
clear sky
28
°
C
28
°
28
°
34 %
2.2kmh
0 %
Fri
28
°
Sat
31
°
Sun
33
°
Mon
33
°
Tue
33
°