27.4 C
New Delhi
Thursday, October 9, 2025
Homeमहाराष्ट्रमावळचे माजी आमदार कृष्णराव भेगडेंचे निधन

मावळचे माजी आमदार कृष्णराव भेगडेंचे निधन

मावळ -मावळ विधानसभेचे माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते कृष्णराव भेगडे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने मावळ आणि परिसरात शोककळा पसरली आहे. आज ( १ जुलै) सकाळी ११ वाजता लेख पॅराडाईज येथील राहत्या घरापासून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. बनेश्वर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती भेगडे कुटुंबीयांनी दिली आहे. सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान लक्षात घेता ‘शिक्षणमहर्षी’ आणि ‘मावळ भूषण’ या गौरवपदकांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते.त्यांच्या निधनामुळे मावळ आणि परिसरात शोककळा पसरली आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत शोक व्यक्त केला आहे. सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान लक्षात घेता ‘शिक्षणमहर्षी’ आणि ‘मावळ भूषण’ या गौरवपदकांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते.त्यांच्या निधनामुळे मावळ आणि परिसरात शोककळा पसरली आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत शोक व्यक्त केला आहे. राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीला १९७२ मध्ये कृष्णराव भेगडे मावळमधून जनसंघाच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर १९७७ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि १९७८ मध्ये पुन्हा एकदा विधानसभेवर निवडून आले. पुढे १९९२ आणि १९९४ या दोन वेळा ते विधान परिषदेवरही निवडून गेले होते.त्यांच्या राजकीय वाटचालीदरम्यान अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या.

याच काळात शरद पवार यांनी संरक्षण मंत्रिपदाचा राजीनामा देत केंद्रातून राज्यात येऊन पुन्हा मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली होती. अशा राजकीय वर्तुळात भेगडे यांचे ठसठशीत अस्तित्व होते. भेगडे यांना ‘शिक्षणमहर्षी’ आणि ‘मावळ भूषण’ या उपाधींचा सन्मान प्राप्त झाला होता. त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील, अशा भावना अनेक मान्यवरांनी व्यक्त केल्या आहेत. काँग्रेसमध्ये असताना कृष्णराव भेगडे शरद पवार यांच्यासाठी विधानपरिषदेचा राजीनामा दिला होता. त्यानंतर १९९४ साली त्यांना पुन्हा विधानपरिषदेवर संधी देण्यात आली. ती टर्म संपल्यानंतर त्यांनी २००० साली राजकारणातून निवृत्ती घेतली. चार टर्म आमदार राहिल्यानंतर कृष्णराव भेगडे शरद पवार यांच्यासोबत राहिले. कृष्णराव भेगडे यांच्या निधनाने मावळ तालुक्याच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रावर मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना संपूर्ण तालुक्यातून व्यक्त केली जात आहे. केवळ राजकीय क्षेत्रातच नव्हे, तर शिक्षणाच्या प्रसारासाठी त्यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय आहे. भेगडे यांनी विद्यार्थ्यांसाठी अनेक शाळा आणि महाविद्यालयांची उभारणी केली. त्यांच्या लोकसेवेच्या कार्यामुळे त्यांना ‘शिक्षणमहर्षी’ आणि ‘मावळ भूषण’ या मानाच्या उपाधींनी गौरविण्यात आले होते.

ते संयमी नेतृत्वाचे प्रतीक मानले जात होते. पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन सर्वपक्षीय नेत्यांमध्ये त्यांना मानाचा दर्जा होता. त्यांच्या कार्यक्षमतेमुळे ते सर्वसामान्यांतही लोकप्रिय होते. कृष्णराव भेगडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय स्वयंसेवक होते. संघाच्या विचारसरणीवर आधारित भारतीय जनसंघ या पक्षातून त्यांनी राजकीय जीवनाची सुरुवात केली. पुढे त्यांनी विविध राजकीय प्रवाहांमधून वाटचाल करत मावळच्या विकासात मोलाचा वाटा उचलला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
27.4 ° C
27.4 °
27.4 °
32 %
4.2kmh
0 %
Thu
30 °
Fri
31 °
Sat
33 °
Sun
33 °
Mon
33 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!