सोलापूर :- महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मियांमध्ये 60 वर्षे व त्यावरील वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” देशात हिंदू धर्मात चारधाम यात्रा, अमरनाथ यात्रा तसेच इतर धर्मियांचीही मोठी तीर्थस्थळे आहेत जिथे पुण्य कर्म म्हणून आयुष्यात एकदा तरी जाण्याचे बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचे स्वप्न असते. सदर बाब विचारात घेवून सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थ स्थळांना जाऊन मन:शांती तसेच अध्यात्मिक पातळी गाठणे सुकर व्हावे यासाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मियांमधील 60 वर्षे व त्यावरील वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडील दिनांक 14 जुलै 2024 च्या शासन निर्णयानुसार राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.
त्यानुसार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे अध्यक्षतेखाली दिनांक 3 ऑक्टोबर 2024 रोजी संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीमध्ये श्री. जगन्नाथ मंदिर, पुरी ओरिसा या ठिकाणासाठी तीर्थदर्शनाकरिता पात्र 800 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली असून त्यास अनुसरून दिनांक 22 ऑक्टोबर ते दिनांक 27 ऑक्टोबर 2024 पर्यंत एकुण 6 दिवस तीर्थदर्शनास जाणेकरिता शासनाने मान्यता दिलेली आहे. सदरील तीर्थदर्शनास जाणेकरिता रेल्वे आरक्षित करण्यात आले असल्याची माहिती समाज कल्याण सहायक आयुक्त सुलोचना सोनवणे यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन” योजनेंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील 800 जेष्ठ नागरिक जाणार
श्री जगन्नाथ मंदिर, पुरी ओरिसा तीर्थदर्शनास
RELATED ARTICLES
New Delhi
mist
27.1
°
C
27.1
°
27.1
°
89 %
1.5kmh
40 %
Fri
34
°
Sat
38
°
Sun
38
°
Mon
38
°
Tue
38
°