37.2 C
New Delhi
Thursday, March 12, 2026
Homeमहाराष्ट्ररस्ते स्वच्छता करणाऱ्या महिला स्वच्छता दूतांची आरोग्य तपासणी

रस्ते स्वच्छता करणाऱ्या महिला स्वच्छता दूतांची आरोग्य तपासणी

पिंपळे गुरव येथील कै. काळूराम जगताप जलतरण, हॉलमध्ये पिंपळे गुरव ,नवी सांगवी परिसरातील  पालिकेकडे काम करणाऱ्या ठेकदारांच्या 70 रस्ते स्वच्छताः करणाऱ्या महिलांची आरोग्य तपासणी व मार्गदर्शन डॉ प्रदिप नन्नवरे ,डॉ. शिवानी घुमरे –आरकर यांनी मार्गदर्शन करून व दाताची व आरोग्याची मोफत तपासणी करून आरोग्य मार्गदर्शन केले.


मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड म्हणाले की, जिच्या उदरातून जन्म घेते दुनिया सारी, विश्व शक्तीचे नाव आहे नारी असे म्हणत आजही स्त्रिया शेतातील खुरपणीपासून नासापर्यंत पुरुषाच्या खांदाला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहेत महिला घरकाम सांभाळून इतरांच्या आरोग्याची काळजी घेऊन शहर स्वच्छ ठेवण्यात मोलाचा वाटा असतो परंतु आपल्या आरोग्याकडे त्या दुर्लक्ष करताना दिसतात म्हणून आम्ही महिला दिनी हा उपक्रम घेतला असल्याचे जोगदंड यांनी सांगितले.
पालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी शांताराम माने म्हणाले की,”आपल्याला समाजाचे काहीतरी देणे लागतो आणि ते दिले पाहिजे”या उदात्त भावनेतून ही संस्था वंचित, कष्टकरी वर्गासाठी नेहमीच असे स्तुत्य उपक्रम राबवून पालिकेच्या विविध सामाजिक उपक्रमात सहभागी होत आसते असे त्यांनी गौरवोद्गार काढले.
आरोग्य निरीक्षक स्नेहल सोनवणे म्हणाल्या की, आमच्या रस्ते स्वच्छता  करणाऱ्या महिला मुळेच नागरिकांचे आरोग्य चांगले राहते आणि रस्ते स्वच्छ राहिल्यामुळे शहर स्वच्छ राहते आणि त्यामुळेच पालिकेचा यावर्षी केंद्रात पहिला क्रमांक येण्यासाठी निश्चितच  त्यांची मदत होणार आहे. माझा केलेला सन्मान माझा नसून माझ्याबरोबर स्वच्छतेचे काम करून मला मदत करणारा सर्व महिलांचा आहे.
डॉ.शिवानी घुमरे–आरकर म्हणाल्या कि, मला माझ्या वडिलाकडूनच समाजसेवेचा वसा लाभलेला आहे आणि आज स्वतःचे क्लिनिक बंद ठेवून आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी काळजी घेणाऱ्या स्वच्छता दूतांची दातांची तपासणी केली खूप आनंद झाला यापुढे मी कुणाला काही आरोग्यविषयक मदत लागल्यास मी सदैव मदत करण्यास तयार आहे.
पुजा हॉस्पिटलचे डॉ. प्रदीप नन्नवरे म्हणाले की,महिलांनी वर्षातून एकदा आरोग्याची तपासणी करावी कारण सध्या शहरात खूप प्रदर्शनाबरोबरच वेगवेगळ्या प्रकारच्या आजाराचे प्रमान वाढलेले आहे,महिला स्वच्छतेतून समाजसेवेचे मोठे काम करत आहे आणि त्या “जनसेवा हीच ईश्वर सेवा” समजून आपल्या नागरिकांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, तुमच्यामुळे शहरातील रस्ते स्वच्छ राहत आहेत असे  डॉ.नन्नवरे म्हणाले कर्करोगासारख्या दुर्जर आजारावर सखोल माहिती देऊन मी गेल्या वीस वर्षापासून सैनिकाच्या कुटुंबाची मी तपासणी फी घेत नाही यापुढे या प्रभागातील सर्व रस्ते स्वच्छता करणाऱ्या महिलांची मी फी घेणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.
रस्ते स्वच्छता करणाऱ्या महिलांबरोबरच बेसिक टिममध्ये ,घंटागाडी वर काम  करणाऱ्या महीलांचा पण  मान्यरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी नवनिर्वाचित नगरसेविकांचाही सन्मान करण्यात आला. पूजा जाधव यांनी स्वच्छतेची शपथ दिली
आरोग्य निरीक्षक स्नेहल सोनवणे “नारीशक्ति कार्यगौरव “पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अण्णा जोगदंड यांनी केले तर आभार शहराध्यक्षा संजना करंजावणे यांनी मानले.

यावेळी पालिकेचे आरोग्य सहाय्यक अधिकारी शांताराम माने ,मानवी हक्क संरक्षण जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड , पूजा हॉस्पिटलचे डॉ. प्रदीप नन्नवरे, डॉ सावनी घुमरे-आरकर,आरोग्य निरीक्षक स्नेहल सोनवणे ,,मानवी संरक्षण जागृतीच्या पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगीता जोगदंड ,उपाध्यक्ष काळुराम लांडगे, सचिव गजानन धाराशिवकर, कार्याध्यक्ष  मुरलीधर दळवी,शहराध्यक्षा संजना करांजावणे, सा.का. गणेश वाडकर, नगरसेविका रवीनाताई अंघोळकर सभापती
शिक्षण समिती ,नगरसेविका  दीप्तीताई कांबळे,
पल्लवीताई जगताप,राम पाटील,ड प्रभागाचे स्वच्छता दूत नंदकुमार धुमाळ ,बाळासाहेब साळुंके,निलेश हंचाटे, अरविंद मांगले, दिपा गराडे,बेसिक टिमचे पवन रंधे, झोनल प्रमुख धीरज फणसे , पूजा जाधव, आशा ,गायकवाड, प्रीती कोरी ,अंकुश कांबळे, रोहित सुरवसे, सागर देवकर, गणेश तारडे, साहेब सूर्यवंशी, सुनील गोहिरात, सुनील नरसिंग ईत्यादी कार्यकर्ते उपस्थिती होते,

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
37.2 ° C
37.2 °
37.2 °
6 %
3.8kmh
85 %
Thu
37 °
Fri
36 °
Sat
36 °
Sun
37 °
Mon
35 °

Most Popular

Recent Comments