13.1 C
New Delhi
Thursday, November 27, 2025
Homeमहाराष्ट्रराजगडावर ३५८ वा ‘आग्य्राहून सुटका स्मृतिदिन’ सोहळा साजरा 

राजगडावर ३५८ वा ‘आग्य्राहून सुटका स्मृतिदिन’ सोहळा साजरा 

किल्ले राजगड येथे ४४ वा दुर्ग राजगड उत्सव

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज की जय…च्या जयघोषात किल्ले राजगडावर ३५८ वा ‘आग्य्राहून सुटका स्मृतिदिन’ सोहळा थाटात साजरा झाला. श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळ पुणे, आणि पुणे महानगरपालिका यांच्या तर्फे किल्ले राजगड येथे ४४ वा दुर्ग राजगड उत्सव आयोजित करण्यात आला होता. किल्ले राजगड आणि पाल खु. येथील खंडोबाचा माळ येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. विविध शेत्रातील मान्यवर , वक्ते , इतिहासकार या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. खंडोबाचा माळ येथे शिव प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मर्दानी खेळ व ढोल ताश्यांच्या गजरात कार्यक्रमास सुरवात झाली. शिव व्याख्याते प्रा.विनायक खोत यांचे शिव व्याख्यान देखील झाले. राजगडावरील पद्मावती मंदिरात जागरण-गोंधळ घालून गड जागरणाचा कार्यक्रम करण्यात आला. किल्ले राजगडावर पद्मावती देवीचे पूजन करून वंश परंपरेने किल्लेदार सुर्यकांत भोसले व १३ मी.४८ सेकंद वेळेत किल्ल्यावर येणारे सुनील जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर ढोल ताश्याच्या गजरात पालखीचे आगमन झाले. पाली दरवाजा येथे निवेदीता पायगुडे, शितल पासलकर, दिपाली कारळे, निलम कुंजीर, पुनम पायगुडे, वैशाली कुऱ्हाडे, जया राऊत आदी महिलांनी पालखीचे पूजन केले. 

पारंपारिक पोशाखातील मावळे व महिला सहभागी झाले होते. जय जिजाऊ जय शिवरायांच्या घोषणा देत पालखी सोहळा सदरेवर आला. तेथे पालखी थोडा वेळ आसनस्थ झाली. व या नंतर पद्मावती मातेच्या मंदिरात देवीला साडी चोळी देऊन पूजन करण्यात आले. या प्रसंगी पुणे मनपा उपायुक्त माधव जगताप, रणजीत पठारे, नितीन चव्हाण, राहुल पायगुडे, संजय दापोडीकर, सुनील वालागुडे, अजित काळे, अनिरुद्ध हळंदे, सतीश सोरटे, नरेंद्र मुजुमदार,पांडुरंग दर्डीगे , शिवाजी पोळेकर, नाना शिर्के, करण भोसले, योगेश दर्डीगे , प्रकाश भोसले,अमित दारवटकर, समीर रुपदे, योगेंद्र भालेराव, मंगेश राव, अमोल व्यवहारे, अभिजित पायगुडे, पांडुरंग मोरे, वीरेंद्र ठाकूर, शशी रसाळ, निलेश बारावकर, प्रशांत पायगुडे, निखिलेश ठाकूर, विवेक नाकोड, गुरुदत्त भागवत, संजय शेंडकर, सुनील तोंडे, महेश कदम, राम कदम, गोविंद राऊत  आदी सहभागी झाले होते.  

पाल खु. राजगड परिसर सर्व ग्रामपंचायत व सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन संचालक पुरातत्व व वस्तूसंग्रहालये संचालनालय, महाराष्ट्र राज्य व सहाय्यक संचालक (पुरातत्व) पुणे विभाग यांचे विशेष सहकार्यातून हा उत्सव पार पडला. 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
13.1 ° C
13.1 °
13.1 °
76 %
0kmh
0 %
Wed
19 °
Thu
25 °
Fri
26 °
Sat
26 °
Sun
25 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!