पुणे, : ” उच्च शिक्षित विद्यार्थ्यांने नोकरीच्या मागे न लागता रोजगार निर्मिती करावी. तसेच सृजनात्मकतेच्या जोरावर स्टार्टअप कडे वळावे. सेमिकंडक्टर, हायड्रोन, कृत्रिम बुद्धिमत्ता सारख्या विषयांवर अत्याधुनिक ज्ञान प्राप्त करणे गरजेचे आहे.” असे मत भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान पार्कचे महासंचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगदाळे यांनी केले. उच्च विद्या घेतल्यानंतर कोणतेही कार्य उत्तमच करावे, परंतु तसे झाले नाही तर त्यासाठी आपण जबाबदार राहू असे ही त्यांनी सांगितले.
नांदे येथील आयएसबीएम कॉलेज ऑफ इंजिनियरींगच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्यूनिकेशन विभागातर्फे आयोजित तीन दिवसीय ‘‘इमर्जिंग ट्रेन्ड्स एंड टेक्नॉलॉजी’ (आयसीईटीटी-२६) या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

यावेळी भोपाळ युनिव्हर्सिटीचे प्र-कुलगुरू डॉ. नवीन कुमार अग्रवाल, इंडियन सोसायटी ऑफ टेक्निकल एज्यूकेशन महाराष्ट्र व गोवाचे कार्यकारी सदस्य डॉ. अशोक मोरे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी आयबीएम चे डिलिव्हरी प्रोजेक्ट एक्झिक्युटिव निरज कुमार होते.
तसेच आयएसबीएम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे अध्यक्ष डॉ. प्रमोद कुमार, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ.ए.एम.सपकाळ, परिषदेचे मुख्य समन्वयक प्रा.सिताराम लोंगानी व प्रा.नेहा सिंग उपस्थित होत्या.
डॉ. राजेंद्र जगदाळे म्हणाले,” उत्कृष्ट नियोजन नसल्याने दिल्ली हे सर्वात प्रदूषित शहर बनले आहे. आज कोणत्याही शहरातील कचर्याची योग्य विल्हेवाट लावली जात नाही. अशावेळेस देशातील प्रत्येक ग्रामिण क्षेत्राचे योग्य नियोजन करण्याची जबाबदारी सुशिक्षित नव युवकांच्या खांद्यावर आहे. मणुष्याच्या शाश्वत विकासासाठी प्रत्येक समस्याचे समाधान शोधण्याची जबाबदारी ही विद्यार्थ्यांवर आहे. त्यासाठी स्टार्टअप सुरू करावे. यासाठी मंत्रालयात करोडो रुपयांचे फंडिंग आहे. हे मंत्रालय नव कल्पनांसाठी मदत करते. त्यासाठी फेलोशिप सुद्धा दिली जाते.”
डॉ. अशोक मोरे म्हणाले,” नव युवकांचे भविष्य खूप सुंदर आहे. त्यासाठी त्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या ज्ञानाबरोबरच कृत्रिम बुद्धिमत्तेचे ज्ञान आत्मसात करावे. देशातील यूथ ब्रेन हा जगात त्याच्या कष्टानेच यशस्वी होत आहे. शिक्षित विद्यार्थ्यांना कल्पनेच्या जोरावर स्टार्टअप सुरू करावे. तसेच प्रत्येक समस्यांचे समाधान शोधण्यास सतत प्रयत्नशील राहावे.”
निरज कुमार म्हणाले,” आधुनिक काळात तंत्रज्ञानाची मॅड रेस सुरू झाली आहे. अशा वेळेस आवश्यक तेवढे ज्ञान आत्मसात करावे. त्यासाठी बॉडी, माइंड आणि ब्रेन यांचे योग्य संतूलन ठेवावे. शिक्षण उत्तम आहे. परंतू जीवनात येणार्या सर्व आव्हानांचा सामना स्वतःला करावा लागेल त्यासाठी सदैव तत्पर असावे. तुम्ही जेव्हा परिवर्तीत व्हाल तेव्हा जग बदलेल. विद्यार्थ्यांनी सतत आपल्या गोल वर लक्ष केंद्रित करावे. साध्या साध्या आइडिया पासून तुम्ही तुमचे जग बदलू शकता.”
डॉ. नवीन कुमार अग्रवाल म्हणाले,” प्रगती करावयाची असेल तर विद्यार्थ्यांनी वेळेचे योग्य नियोजन करणे, उत्तम इंग्रजी शिकणे, इंडस्ट्रीयल ट्रेनिंग घेणे, कंम्प्यूटरमध्ये कोडिंगची भाषा शिकणे, रोजचा होमवर्क करणे आणि छंद जोपासणे अत्यंत आवश्यक आहे. आजच्या काळात कौशल्य आवश्यक असून स्टार्टअप सुरू करावे. ज्यासाठी सरकारने मोठ्या प्रमाणात फंड उपलब्ध केला आहे.”
त्यानंतर डॉ. अशोक सपकाळ यांनी प्रथम ‘इमर्जिंग ट्रेन्ड्स एंड टेक्नॉलॉजी’ (आयसीईटीटी २६) या आंतरराष्ट्रीय परिषदेची माहिती दिली. या परिषदेच्या माध्यमातून २०३० साठी शाश्वत विकासावर कार्य करण्यावर चर्चा केली जाईल. तसेच एआय, डाटा सायन्स, सायबर सिक्यूरिटी, बायोटेक्नोलॉजी सारख्या विषयांवर चर्चा होईल.
आंतरराष्ट्रीय संशोधक वालिदा ऊनरुएन यांनी ऑनलाइन संवाद साधला.
या वेळी इंडियन जर्नल डिजिटल बूकचे प्रकाशन करण्यात आले.
प्रा.नेहा सिंग यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सिताराम लोंगाणी यांनी आभार मानले.
आयएसबीएम कॉलेज ऑफ इंजिनियरींग, नांदे, पुणे.


