28.1 C
New Delhi
Monday, October 27, 2025
Homeमहाराष्ट्रविधानसभा निवडणुकीत चंद्रकांतदादांना किमान दीड लाखाचे मताधिक्य देणार!

विधानसभा निवडणुकीत चंद्रकांतदादांना किमान दीड लाखाचे मताधिक्य देणार!

जनसंघ- भाजपाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा निर्धार

पुणे- कोथरूड विधानसभा निवडणुकीत भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांना किमान दीड लाखाचे मताधिक्य मिळवून देऊन विजयी करणार, असा निर्धार जनसंघ आणि भाजपाच्या सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. जनसंघापासून ते भारतीय जनता पक्षापर्यंतच्या प्रवासात कोथरुड मध्ये संघटन उभारणीसाठी काम करणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा मेळावा कोथरूडमध्ये संपन्न झाला.

यावेळी जगन्नाथ कुलकर्णी, शिवराम मेंगडे, बाळासाहेब मोकाटे, शाम सातपुते , शशिकला मेंगडे, ललिता भावेताई, बाळासाहेब शेडगे, प्रताप चोरघे, बाळासाहेब शेडगे, दिलीप उंबरकर, गणेश पाचलकर, जनार्दन क्षीरसागर, राजाभाऊ जोरी, योगेश थत्ते, भगवान मोहिते, सुधीर पाचपोर, प्रशांत हरसुले, ॲड. वर्षा डहाळे यांच्यासह भाजपचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

जनसंघापासून ते भारतीय जनता पक्षाच्या उभारणीच्या प्रवासात अनेक कार्यकर्त्यांनी जीवाची बाजी लावून काम केले. त्यामुळे कोथरूड मतदारसंघात हिंदुत्व आणि पर्यायाने भाजपाचा बालेकिल्ला झाला. हा किल्ला अभेद्यच आहे. गेल्या निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांना जे मताधिक्य मिळाले; त्यात लाख मतांची भर घालण्यासाठी प्रचार करु! असा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

तसेच, चंद्रकांतदादा पाटील यांनी गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात प्रचंड कामे केली आहेत. या सर्व कामांची जाणीव मतदारांना आहे.” अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
smoke
28.1 ° C
28.1 °
28.1 °
47 %
2.1kmh
75 %
Mon
32 °
Tue
30 °
Wed
32 °
Thu
30 °
Fri
31 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!