25.3 C
New Delhi
Sunday, August 24, 2025
Homeमहाराष्ट्रशरद पवारांनी बारामती वाचवून दाखवावी!

शरद पवारांनी बारामती वाचवून दाखवावी!

बावनकुळेंचं थेट आव्हान

राज्याचे नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदार संघात शरदचंद्र पवार विरोधात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होताना दिसून येत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगणार आहे. दोन्ही उमेदवारांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. तर यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बारामतीत मतांसाठी फिरावं लागत आहे : ‌’शरद पवारांनी बारामती वाचवून दाखवावी‌’. तिथून ते बाहेर पडू शकत नाहीत, एक जागा अवघड जात आहे. पवार यांनी इतकी वर्षे त्या मतदार संघात घालवले. मात्र, त्याच ठिकाणी मतांसाठी रस्त्यावर फिरावे लागत आहे हे दुर्दैव आहे, अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलीय. तर उद्धव ठाकरे यांनी २०१९ मध्ये मोदींचा चेहरा वापरून १८ खासदार निवडून आणले होते. आता त्यांनी तितक्या जागा जिंकाव्या अन्यथा दुकान बंद करावे असे आव्हान देखील उद्धव ठाकरे यांना दिले आहे.
सत्तेच्या लालसेपोटी ठाकरे काहीही करू शकतात : उद्धव ठाकरे सत्तेच्या लालसेपोटी कुठल्याही स्तरावर जाऊ शकतात. बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेससोबत जाण्याची वेळ आली, तर दुकान बंद करू असे सांगितले. त्यांचे वाक्य उद्धव ठाकरे यांनी लक्षात ठेवले असते तर बरे झाले असते. मात्र, ते सोनिया याच्या दरबारी जाऊन बसले, औरंगजेबाच्या कबरीवर जाण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेची स्थापना झालेला उद्देश बाजूला सोडून सत्तेसाठी ते गेले. आपल्या मुलाचे भवितव्यासाठी सत्तेत जाण्यासाठी कुठेही जाऊ शकतात, हे महाराष्ट्राने पाहिले आहे. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काय बोलणार त्यांचा आत्मा आदित्य यांच्यामध्ये, शरद पवार यांचा आत्मा सुप्रिया यांच्यामध्ये अडकला आहे. राहुल गांधी निवडणुका झाल्या की, इटली युरोपमध्ये जाऊन आराम करतील. मात्र, मोदी तसे नाहीत ते रोज काम करतात, असे बावनकुळे यांनी सांगितले.
काँग्रेस फक्त २४० जागा लढवत आहे : महाराष्ट्रात १४ कोटी जनतेने सर्वेमध्ये महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना चांगली दिली पसंती आहे. मोदी सरकारवर विश्वास आहे. त्यामुळे मराठवाड्यातील जनता मोदी यांच्यासोबत आहे. महायुतीत मतभेद नाहीत. प्रत्येकाला वाटते निवडणूक लढवावी. ठाण्याची जागा आम्हाला लढवण्याची इच्छा होती. काही जागा आम्हाला तर काही जागा एकनाथ शिंदे यांना लढवायच्या होत्या. मात्र, मोठा भाऊ आम्ही असल्यानं लहान भावांना घेऊन सोबत जात आहे. महायुतीत मोठा विचार करावा लागतो. देशात सरकार स्थापन करण्यासाठी २७२ + खासदार लागतात, काँग्रेस २४० लढत आहे. पंतप्रधान झाला तर याला त्याला घेऊन करावा लागेल. ते स्थिर सरकार देऊ शकत नाहीत अशी टीका बावनकुळे यांनी केली.
शरद पवार सरकार बनवू शकले नाहीत : शरद पवार यांनी काँग्रेसला धोका दिला. त्यांचे जीवन घर, पक्ष फोडण्यात गेले. महाराष्ट्राला अविकसित ठेवणे, कधी वेगवेगळ्या समाजावर अन्याय करणे असे केले. ठाकरे यांनी सत्तेसाठी केलं तर पवार यांनी सत्तेसाठी तडजोडी केल्या. ममता बॅनर्जी यांनी स्वत:च सत्ता स्थापन केली. अनेक पक्षांनी सत्ता मिळवली, मात्र शरद पवार यांनी कधी सत्ता स्थापन केली नाही. महाराष्ट्राच्या जनतेने कधी त्यांना स्वीकारले नाही. पंतप्रधान हे थेट नागरिकांशी संवाद साधतात याचा अभिमान आहे. सर्व देशात फिरतात. गुजरात, राजस्थान सगळ्या राज्यात जातात. त्यांना उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासारखी घरी बसण्याची सवय नाही अशी टीका, बावनकुळे यांनी केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
few clouds
25.3 ° C
25.3 °
25.3 °
79 %
3.2kmh
18 %
Sun
31 °
Mon
31 °
Tue
35 °
Wed
37 °
Thu
37 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!