पिंपरी:- “मतदार राज जागा हो, लोकशाहीचा धागा हो” , “जन जन का यही नारा, मतदान है अधिकार हमारा”, “ज्येष्ठ असो की जवान, सर्वांनी करा मतदान”, अशा घोषणांनी मिलेनियम, एल्प्रो मॉलसह शहरातील विविध मॉल्सचा परिसर दुमदुमला. यावेळी मतदार जनजागृती अभियानात मोठ्याप्रमाणात नागरिकांनी सहभाग घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याची शपथ घेतली. सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या पिंपरी, भोसरी आणि चिंचवड मतदार संघात मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी महापालिकेच्या वतीने आयुक्त शेखर सिंह आणि अतिरिक्त आयुक्त तथा स्वीप नोडल विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपआयुक्त अण्णा बोदडे यांच्या नियंत्रणाखाली मतदार जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने रविवारी शहरातील विविध मॉल्स मध्ये मतदार जनजागृती अभियान राबविण्यात आले. यावेळी नागरिकांनी अभियानानात सक्रीय सहभाग नोंदवत मतदान करणार असल्याचे सांगितले. यावेळी उपआयुक्त अण्णा बोदडे यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले. यावेळी मुख्य लिपिक देवेंद्र मोरे, किसन केंगले, अभिजित डोळस, विकास गायकांबळे, ओंकार पवार, पियुष घसिंग, सचिन महाजन, मिलेनियम मॉलचे केंद्रीय संचालक, विक्रम पै, जनरल मनेजर जावाज शेख, योगेश घोसाळकर, सोहेल शेख, अविनाश माने, अमित अंबुरे, गजानन दस्के, संतोष शिंदे, कल्याण साते, मंदार यंदे, सुरज थापा, भूषण जोशी आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
महापालिकेच्या वतीने विविध मॉलमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. मतदार जनजागृतीपर संगीत नृत्याचे सादरीकरण जीएनडी ग्रुपच्या बाल कलाकारांद्वारे करण्यात येत आहे. आकर्षक नृत्य व चित्तथरारक शारीरिक कवायती या बाल कलाकारांकडून सादर करण्यात येत आहेत. या कलाकारांना नागरिकांकडून कौतुकाची दाद आणि प्रशंसा मिळते आहे. तसेच ज्येष्ठ कलाकारांकडून मतदार जनजागृतीपर पथनाट्य सादर करण्यात येत आहे. नागरिकांना विविध माध्यमातून मतदान करण्यासाठी प्रेरित करण्यात येत असून सर्व मतदारांनी आपला मताचा अधिकार बजवावा असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
शहरातील मॉल्स मध्ये घुमला मतदारांचा आवाज
महापालिकेच्या मतदार जनजगृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
RELATED ARTICLES
New Delhi
clear sky
29.7
°
C
29.7
°
29.7
°
32 %
2.6kmh
0 %
Fri
31
°
Sat
31
°
Sun
33
°
Mon
33
°
Tue
33
°