पंढरपूर :- श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीस शुभांगी संजय गुरव यांनी सुमारे 4 किलो वजनाच्या चांदीच्या दोन फुलदाणी अर्पण केल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.
त्याबद्दल मंदिरे समितीच्या वतीने देणगीदार यांचा मंदिर समितीच्या सदस्या शकुंतलाताई नडगिरे यांनी श्री विठ्ठलाची प्रतिमा व उपरणे देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी देणगीदार यांचे कुटुंब व विभाग प्रमुख संजय कोकीळ उपस्थित होते.

देणगीदार यांनी श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या पुजेवेळी उपयोगी साहित्य उपलब्ध करून देण्याची इच्छा मंदिर समितीच्या सदस्या शकुंतलाताई नडगिरे यांचेकडे व्यक्त केली होती. त्याप्रमाणे त्यांनी आज 4100 ग्रॅम वजनाच्या दोन चांदीच्या फुलदाणी श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या चरणी अर्पण केल्या असून, त्याची अंदाजित किंमत 3 लाख 81 हजार होत आहे. सदर फुलदाणीचा उपयोग देवाच्या पुजेवेळी फुले घेऊन जाण्यासाठी होणार आहे. देणगीदार भाविक जखांवडी तालुका खानापूर जिल्हा सांगली येथील रहिवाशी असून, श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या निस्सिम भक्त आहेत.