पुणे : शुक्रवार पेठेतील श्री शिवाजी मराठा सोसायटीत भारताचा ७८ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना आणि समाजभूषण बाबुराव उर्फ अप्पासाहेब जेधे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हर घर तिरंगा उपक्रम’ अंतर्गत प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या सर्व शाखांमधून ६०० विद्यार्थी प्रभात फेरीत सहभागी झाले होते.
यावेळी माजी शिक्षणाधिकारी अनिल गुंजाळ, श्री शिवाजी मराठा सोसायटीचे उपाध्यक्ष राजेंद्र जगताप, सहसचिव विकास गोगावले, खजिनदार जगदीश जेधे, नियामक मंडळ अध्यक्ष सत्येंद्र कांचन, कारभारी मंडळ अध्यक्ष सुरेश देसाई, सदस्य कमलताई व्यवहारे, तानाजी घारे, एम.बी. गायकवाड, अमर शिंदे, डॉ.शोभा इंगवले, विद्यार्थी, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
प्रभात फेरीची सुरवात शुक्रवार पेठेतील श्री शिवाजी मराठा सोसायटीतून झाली. व्हाईट हाऊस मित्र मंडळ- फडगेट पोलीस स्टेशन- खडक पोलीस स्टेशन व मामलेदार कचेरी मार्गे प्रभात फेरी संपन्न झाली.
मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर जिजामाता मुलींचे हायस्कूल, श्री शिवाजी मराठा हायस्कूल, समाजभूषण बाबुराव उर्फ अप्पासाहेब जेधे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली. प्राचार्या डाॅ. दिपाली पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. डाॅ. अमित गोगावले यांनी सूत्रसंचालन केले. दिलीप काकडे यांनी आभार मानले.