पुणे, -: सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता इंडक्शन प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालक व विद्यार्थ्यांनं कडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या (एसएसपीयूच्या) प्र कुलपती डॉ. स्वाती मुजुमदार यांनी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता विद्यार्थ्यांनंचे स्वागत केले. यावेळी ब्रिगेडियर वीरेश, संचालक, प्रादेशिक तंत्रज्ञान नोड (RTN), मुख्यालय दक्षिण कमांड; सुशील कुमार, ग्लोबल हेड आणि व्हाइस प्रेसिडेंट, टाटा टेक्नॉलॉजीज; अथर्व राजे- माजी विद्यार्थी, सोहम चव्हाण- माजी विद्यार्थी हे उपस्थित होते.

सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या (एसएसपीयूच्या) प्र कुलपती डॉ. स्वाती मुजुमदार मार्गदर्शन करताना म्हणाल्या, ” शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करीत स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. एसएसपीयू कौशल्य शिक्षणाला वाहिलेले विद्यापीठ असल्याने या मध्ये ७०% प्रॅक्टिकल आणी ३०% थेरी आसा अभयसक्रम आहे, यामुळे १००% मुलांना नोकरी मिळण्याकरिता मदत होते, शिवाय कॉलेजला एनआयआरएफ रँकिंग देखील आहे. मुलांना व्यवसाय उद्योगामध्ये प्रत्यक्ष इंटर्नशिप करण्याची संधी दिली जाते, या मुळे विद्यार्थ्यांना स्वतःची आवड निवड समजून घ्यायला मदत मिळते. इंटरडिसिप्लिनरी स्कूल ऑफ सायन्स हा विभाग आपल्याकडे असल्याने विद्यार्थ्यांना स्वतःमधील लपलेले गुण व कौशल्य शोधायला मदत मिळते, आणि ते स्वतःचा वेगळा मार्ग निवडू शकतात. जागतिक विद्यपीठांशी आमची भागीदारी असल्याने स्टुडन्ट एक्सचंगे प्रोग्रॅमच्या माध्यमातून जागतिक समन्वय साधून विविध व्यावसायिक संधी शोधता येतात, उच्च शिक्षणाकरिता मार्ग मोकळे होतात. तसेच विद्यार्थ्यांनंनी हे लक्षात घेणं गरजेच आहे कि कौशल्य आधारित हे शिक्षण असल्याने विद्यार्थ्यांनंनी चालू वर्ग बुडवता काम नये. कॉलेज मध्ये लॅब या जास्त कळा करीता विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जातात, यामुळे मुले त्याच्या उज्वल भविष्यासाठी तयार होतात “
यावेळी माजी विद्यार्थी अथर्व राजे, सोहम चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. अथर्व राजे बोलताना म्हणाले, ” मी शैक्षणि आयुष्यात जे कौशल्य शिकलो ते मी माझ्या व्यवसायात आणले, आणि याच जोरावर मी एका कंपनीच्या ३ कंपनी उभ्या केल्या. कौश्यल्य विद्यापीठात शिकण्याचा हाच फायदा मला झाला, कौश्यल्य प्रत्यक्ष जीवनत कसे वापरायचे हे मला सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून शिकता आले”.
सोहम चव्हाण याने आपला अनुभव सांगताना म्हणाले,” मी सिंबायोसिस स्किल्स युनिव्हर्सिटी मध्ये आलो तेव्हाच मला कळले कि मी योग्य ठकाणी आहे. यातून मी शिकलो नेहमी एक उद्दिष्ट्य डोळ्यसमोर ठेवने गरजेचे आहे. जे कौश्यल्य तुम्ही शिकता ते प्रत्यक्ष आयुष्यात वापरायला शिका. वर्गात शिकवताना लक्ष द्या, नवीन संकल्पना समजावून घ्या आणि भरपूर मित्र बनवा. यानेच तुमचे पुढ जाण्याचे मार्ग मोकळे होत जातील”.
ब्रिगेडियर वीरेश, संचालक, प्रादेशिक तंत्रज्ञान नोड (RTN), मुख्यालय दक्षिण कमांड, म्हणाले,”कॉलजे हे तुमचं एक लॉन्च पॅड आहे, इथूनच उज्वल भविष्याची सुरुवात होत असते फक्त परीक्षा पास होण्याकरिता नाही तर नवीन मार्ग शोधण्याकरिता कॉलजे मध्ये या. कम्फर्ट झोन मधून बाहेर या, ज्ञान मिळ्वण्यासाठी नेहमी भुकेले राहा, अभ्यासक्रमा व्यतिरिक्त ज्ञानार्जन करा. या मध्ये स्वयं शिस्त अतिशय महत्वाची आहे. अयुशात जे काही करताल त्याच्याशी प्रामाणिक राहा. जेव्हा तुम्हाला कोणी बघत नसते तेव्हा तुमची असणारी वागणूक हा तुमचा खरा स्वभाव असतो, त्यावेळी तुम्ही काय वागत हे म्हत्वाचे. अपयश हे यशाचा भाग आहे, अपयशाने खचू नका. आत्मनिर्भर होने हि एक खूप मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे स्वतःचे भविष्य घडवण्याकडे लक्ष द्या. “
सुशील कुमार, ग्लोबल हेड आणि व्हाइस प्रेसिडेंट, टाटा टेक्नॉलॉजीज, म्हणाले ” शिक्षण हे कळा नुसार बदलणे गरजेचे आहे. आजच्या काळात जास्त नोकऱ्या निर्माण करणाऱ्यांची गरज आहे. त्याच बरोबर मित्रांचं एक जाळ तयार करा, एक विषय निवडून त्यामध्ये खोल अभ्यास करा. हि चार वर्ष तूमच भविष्य बदलण्यासाठी वापरा. निर्णय घ्या आणि तो योग्य कारण्यासाठी प्रयत्न करा.”